Nanded: परभणीत चार वैद्यकीय अधिकारी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news
परभणीत चार वैद्यकीय अधिकारी निलंबित

परभणीत चार वैद्यकीय अधिकारी निलंबित

परभणी : जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य केंद्रातील चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शिवानंद टाकसाळे यांनी बुधवारी (ता.दहा) निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अपुरी वैद्यकीय सेवा, मिशन कवच कुंडल अभियानाअंतर्गत कोरोना लसीकरणातील असमाधानकारक कामगिरीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याबाबत संबंधितांना करणे दाखवा नोटीस बजावूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबनाची कारवाई झालेले वैद्यकीय अधिकारी व त्यांच्यावर ठेवलेला ठपका असा ः डॉ. प्रकाश वाठोरे (प्राथमिक आरोग्य केंद्र वालूर, ता. सेलू), डॉ. अविनाश राजूरकर (प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघाळा, ता. पाथरी), डॉ. विष्णू माने (प्राथमिक आरोग्य केंद्र, राणी सावरगाव), डॉ. कृष्णदास पळशीकर (प्राथमिक आरोग्य केंद्र, बाभळगाव, ता. पाथरी)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

निलंबनाची कारवाई केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून कायमस्वरूपी काढून टाकण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच आरोग्य विभाच्या आयुक्तांकडे पाठवणार आहे. होत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अशीच कडक कारवाई करण्यात येईल.

- शिवानंद टाकसाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी.

loading image
go to top