नांदेड : वार्ड आरक्षणाच्या फेर सोडतीत अंशतः बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 नांदेड : वार्ड आरक्षणाच्या फेर सोडतीत अंशतः बदल

नांदेड : वार्ड आरक्षणाच्या फेर सोडतीत अंशतः बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड (अर्धापूर) ः आगामी काळात होणाऱ्या अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेले वार्ड आरक्षणाच्या फेर सोडतीत अंशतः बदल झाला आहे. वार्ड क्रमांक सहा खुल्या प्रवर्गसाठी राखीव झाला तर आठ खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. आरक्षणाच्या फेर सोडतीत काही बदल होईल अशा आशेवर असलेल्या भावी, आजी, माजी नगरसेवकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. तर काहींची संधी गेल्याने अपेक्षा भंग‌ झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आगामी काळात होणाऱ्या अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सोमवारी (ता. १५) काढण्यात आली. या फेर सोडतीत ओबीसी प्रवर्गसाठी चार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पुर्वी पाच जागा होत्या. विशेष म्हणजे अर्धापूर शहरात ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या ही सुमारे ७० टक्के आहे. तर आरक्षण मात्र २४ टक्के मिळते. तर अनुसुचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या कमी असल्याने एक जागा भरली जात नाही. ही आरक्षणाची फेर सोडत उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर मुख्याधिकारी शैलेश फडसे, तहसीलदार उज्वला पांगारकर यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. त्यांना अभियंता नागनाथ देशमुख अनिल मोरे विजय गंधनवाड, परवेझ हुसैन यांनी सहकार्य केले.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

आगामी काळात होणाऱ्या अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी फेर सोडतीत आरक्षण पुढील प्रमाणे राहिल. या आरक्षण सोडत व वार्ड रचनेवर ठराविक मुदतीत आक्षेप घेता येणार आहे. एक ओबीसी प्रवर्ग‌, दोन खूला प्रवर्ग, तीन खुला प्रवर्ग, चार खुला प्रवर्ग महिला, पाच खुला प्रवर्ग महिला, सहा खुला प्रवर्ग, सात ओबीसी प्रवर्ग, आठ खुला प्रवर्ग महिला, नऊ ओबीसी महिला प्रवर्ग, दहा खुला प्रवर्ग, ११ खुला प्रवर्ग महिला, १२ खुला प्रवर्ग महिला, १३ खुला प्रवर्ग, १४ अनुसुचित जाती महिला प्रवर्गसाठी, १५ खुला प्रवर्ग महिला, १६ ओबीसी महिला प्रवर्ग, १७ अनुसूचित जाती प्रवर्गसाठी राखीव झाला आहे.

या आरक्षण सोडतीला आर.आर. देशमुख शेख लायक, किशोर देशमुख, डॉ. विशाल लंगडे, आनंद सिनगारे, सोनाजी सरोदे, ओमप्रकाश पत्रे, छत्रपती कानोडे, शिवराज जाधव, तुकाराम साखरे, राजेश राऊत, पिराजी साखरे, राहूल हाट्टेकर, उमेश सरोदे, शमिउल्ला बेग, प्रल्हाद माटे, नवनाथ बारसे, सचिन येवले, मुनिरभाई तांबोळी, युसुफ पठाण, शेख मकसूद, आबुजार बेग, गौस मुल्ला आदी उपस्थित होते.

loading image
go to top