esakal | नांदेड : प्रवाशांनो सावधान- गुंगीचे औषध पाजून डॉक्टरचे सव्वा लाख लूटले 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे राहणारे डाॅ. शालिकराम किशन जाधव (वय ३४) हे ता. १० नोव्हेंबर च्या रात्री सिकंदराबाद ते कामारेडी बिलोली येथून बीआर ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत होते.

नांदेड : प्रवाशांनो सावधान- गुंगीचे औषध पाजून डॉक्टरचे सव्वा लाख लूटले 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : खाजगी बसमधून प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या एका प्रवाशाने शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध टाकून एक लाख २१ हजार २०० रुपयाचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात लुटमार झालेल्या डॉक्टरच्या तक्रारीवरुन गुरुवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे राहणारे डाॅ. शालिकराम किशन जाधव (वय ३४) हे ता. १० नोव्हेंबर च्या रात्री सिकंदराबाद ते कामारेडी बिलोली येथून बीआर ट्रॅव्हल्समधून प्रवास करीत होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अन्य प्रवाशाने त्यांच्याशी मैत्री करत चांगल्या चर्चा केल्या. त्यानंतर शीतपेय पिण्याच्या बहाण्याने त्यांना गुंगीचे द्रव्य दिले. या औषधाने बेशुद्ध झालेल्या डाॅ. शालिकराम जाधव यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, दोन अंगठ्या व रोख एक हजार २०० रुपये, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे असा एकूण एक लाख २१ हजार २०० रुपयांचा ऐवज काढून घेतला. डाॅ. शुद्धीवर येईपर्यंत आरोपी हा बसमधून उतरला होता. या प्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास केंद्रे करत आहेत.

हेही वाचानांदेड : कॉ. रविंद्र जाधव यांच्या जिद्दीमुळेच होतेय ख्रिश्चन दफनभूमिचा कायापालट -

हॉटेल चालकास जिवे मारण्याचा प्रयत्न 

भोकर- हॉटेलवर जेवण करीत असताना चपाती लवकर का दिली नाही या कारणावरुन हॉटेलचालक याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीविरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकर ते म्हैसा जाणाऱ्या रस्त्यावर राहटी शिवारात लक्ष्मण पोतन्‍ना पुरमोड यांचे हॉटेल आहे. या हॉटेलवर जेवणासाठी आरोपी अन्य सहकार्‍यांसोबत आला होता. चपाती वेळेवर का दिले नाही या कारणावरून आरोपीने हॉटेल चालक पूरमोड यांच्याशी वाद घातला. याप्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

loading image