esakal | नांदेड : तीन महिण्यनंतर पेनूर खूनप्रकरणी गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ऊस तोडणीच्या कामासाठी उचल दिलेल्या कारणावरून संतोष एडके यांचे वडील श्यामराव राघोजी एडके (६०) यांचे जमिनविक्री संदर्भात खोटे कागदपत्र तयार केले.

नांदेड : तीन महिण्यनंतर पेनूर खूनप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : तीन महिण्यापुर्वी पेनूर शिवारात एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून सोनखेड पोलिसांनी सात जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ऊस तोडणीच्या कामासाठी उचल दिलेल्या कारणावरून संतोष एडके यांचे वडील श्यामराव राघोजी एडके (६०) यांचे जमिनविक्री संदर्भात खोटे कागदपत्र तयार केले. यावेळी दिलीप वाघमारे व प्रकाश वाघमारे यांनी मयत श्यामराव एडके यांना ता. एक जुलै रोजी सोबत घेवून जावून बालाजी एडके, साई एडके, रमेश एडके, बाहूबली मालगावे व भारत मालगावे यांच्या मदतीने पेनूर शिवारात खून केला. या प्रकरणी सोनखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली होती. दरम्यान या प्रकरणी लोहा न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सोनखेड पोलिसांनी सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रास्तभाव धान्य दुकानात तीन महिन्यांची साखर उपलब्ध

नांदेड :  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2020 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो (प्रति महिना) याप्रमाणे मंजूर केले आहे. सदर महिन्यात जिल्ह्यासाठी 2 हजार 94 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधित स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणार आहे.

तालुका निहाय नियतन (क्विंटलमध्ये) 

नांदेड-193.5, अर्धापूर- 39, मुदखेड-33, कंधार-73.5, लोहा-147.5, भोकर-86.5, उमरी-54.5, देगलूर-135.5, बिलोली-105, नायगाव- 130.5, धर्माबाद-65, मुखेड-198, किनवट-454.5, माहूर-209, हदगाव-80, हिमायतनगर-89 याची सर्व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनी स्वस्त धान्य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.