esakal | Nanded : पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price

Nanded : पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (ता.आठ) मध्यरात्रीपासून नांदेड शहरात पेट्रोल ११२ रुपये ११ पैसे तर डिझेल १०० रुपये ९६ पैसे प्रतिलिटर प्रमाणे विक्री होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेड्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाही. देशाच्या राजधानीसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.

११ दिवसात २.३५ रुपयांनी महागलं पेट्रोल

सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. या आठवड्यात केवळ दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. याव्यतिरिक्त दरदिवशी यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये दोन रुपये ३५ पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेल तीन रुपये ५० पैशांपर्यंत महागलं आहे.

"केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का? यामुळे काय फायदा होणार? यासारखे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत."

- संगीता वामनराव गोराडे (सामाजिक कार्यकर्ती)

"पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देता, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्यावर येतील. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल ५६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५५ रुपये प्रति लिटर विकलं जाईल."

- डॉ. बालाजी सदाफुले (निवृत्त अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

महागाईने सर्वसामान्य त्रस्त

  • नांदेडमध्ये पेट्रोल ११२.११

  • डिझेलचा दर १००.९६

loading image
go to top