नांदेड : कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झुम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेद्वारे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली.

नांदेड : कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन कार्यशाळा 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील सर्व जिनिग मालकांनी शासकीय कापुस खरेदीसाठी जिनिंगचा परिसर व जिनिंग दुरुस्ती करुन सज्ज रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झुम व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेद्वारे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पुढील खरीप हंगामात कापुस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे जैविक पध्दतीने किड नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोडर्मा व क्रायसोफा यांच्या उत्पादनासाठी कापुस क्षेत्र जास्त असलेल्या तालुक्यामध्ये बचतगटांना प्रशिक्षण देवून चालना द्यावी असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

हेही वाचा -  हिवाळी अधिवेशनात झालेल्या बदलामुळे शिल्लक राहणाऱ्या निधीतून दिव्यांगांना अर्थसहाय्य करा - राहुल साळवे -

यांची होती उपस्थिती

या कार्यशाळेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शिवाजी तेलंग, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील कापूस जिनिंग कंपनीचे मालक, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी कापसाची फरदड घेवू नये

या कार्यशाळेत कृषीतज्ञांनी शेतकऱ्यांनी कापसाची फरदड घेवू नये असे आवाहन केले. याऐवजी रब्बी पिके जसे गहु, हरभरा, करडई इ. पिके घेण्याचे सूचविले. मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. याहीवर्षी चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रात वाढ होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही कृषी विकास अधिकारी संतोष नादरे यांनी सांगितले.

loading image
go to top