

Nanded News
esakal
नांदेड: शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाने प्ली बार्गेनिंगच्या माध्यमातून आरोपीस शिक्षा सुनावली. जिल्ह्याच्या सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे प्ली बार्गेनिंगद्वारे न्यायनिर्णय देण्यात आल्याची नोंद झाली आहे.