esakal | नांदेड पोलिस परिक्षेत्राची कमान निसार तांबोळी यांच्या हाती
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना कोल्हापूर परिक्षेत्रात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी निसार तांबोळी यांना पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नांदेडला नियुक्ती देण्यात आली आहे.

नांदेड पोलिस परिक्षेत्राची कमान निसार तांबोळी यांच्या हाती

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यात गृहविभागाच्या उपसचिवानी आपल्या स्वाक्षरीत बुधवारी (ता. दोन) काढण्यात आलेल्या बदली आदेशात नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची बदली कोल्हापूर परिक्षेत्रात करण्यात आली. तर त्यांच्या जागी म्हणजेच नांदेड परिक्षेत्र नांदेडसाठी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना पाठविण्यात आले आहे.

राज्यातील २५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढण्यात आले. पोलिस विभागावर असलेल्या बदलीच्या संक्रातीला अखेर पूर्णविराम मिळाला. त्यात रजनी शेठ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक करण्यात आले. आठ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नतीत पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांना कोल्हापूर परिक्षेत्रात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागी निसार तांबोळी यांना पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नांदेडला नियुक्ती देण्यात आली आहे. निसार तांबोळी यांनी आपली पोलिस दलातील सुरुवात नांदेड जिल्ह्याच्या भोकर उपविभागातील सुरू केलेली आहे.

हेही वाचा नांदेड : लॉकडाऊच्या कालावधीत अटी व शर्तीसह 30 सप्टेंबरपर्यंत वाढ -

चंद्रकिशोर मिना अमरावतीचे आयजी

अनेक उत्कृष्ट पदावर कार्य करून आपल्या कामाची दखल सरकारला घ्यावी लागली. म्हणूनच ते पोलीस उपमहानिरीक्षक असताना विशेष पोलीस महानिरीक्षक काच्या जागी त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. असाच काहीसा प्रकार नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्यासाठी सरकारने केला आहे. त्यांना अमरावती पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पद देण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी आरती सिंह यांना अमरावतीचे पोलिस आयुक्तपद देण्यात आले आहे. २६/११ च्या हल्ल्यात अतिरेक्यांसोबत भिडलेल्या सदानंद दाते यांना मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त हे पद देण्यात आले आहे.

येथे क्लिक कराभाजपचे ध्येय धोरणं तळागाळापर्यंत पोहंचा- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

संदीप कर्णिक हे पश्चिम विभागाचे अपर आयुक्त 

नांदेडमध्ये परिविक्षाधीन पदावर कार्यरत असलेले संजय दराडे यांना अप्पर पोलीस आयुक्त मुंबई पूर्व विभाग या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. तर नांदेडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सत्यनारायण चौधरी यांना दक्षिण विभागाचे अप्पर आयुक्त पद मिळाले आहे. संदीप कर्णिक हे पश्चिम विभागाचे अपर आयुक्त झाले आहे. अशा पंचवीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पदोन्नत्या आणि नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.