esakal | नांदेड : कारचालकास मारहाण करुन दोन लाखाची सोन्याची चैन पळविणाऱ्यास पोलिस कोठडी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ही घटना भोकर ते नांदेड रस्त्यावर कलदगाव पाटीजवळ बुधवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास घडली.

नांदेड : कारचालकास मारहाण करुन दोन लाखाची सोन्याची चैन पळविणाऱ्यास पोलिस कोठडी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका कारला ओव्हरटेक करून समोर येऊन आपल्या जीपने धडक देऊन कारमधील व्यक्तीस जबर मारहाण करुन त्याच्या गळ्यातील दोन लाखाची सोन्याच चैन जबरीने चोरुन घेतली. ही घटना भोकर ते नांदेड रस्त्यावर कलदगाव पाटीजवळ बुधवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुरुवारी (ता. २७) अर्धापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुखेड शहरातील व्यापारी सतिश देबडवार हे बुधवारी (ता. २६) ऑगस्ट रोजी आपली इनोव्हा कार (एमएच- २६-००२१) भोकर बारडमार्गे मुखेडला येत होते. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास या मार्गावरील भोकर फाटाजवळ असलेल्या कलदगाव पाटीजवळ आल्यानंतर त्यांच्या पाठलाग करणारी जीप (एमएच२६-बीसी-९८९८) च्या चालकाने ओव्हरटेक केले. समोर येताच माझ्या कारला धडक दिली. यात कारचेही नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर माझ्या चालकास व मला आरोपी केशव राम मुद्देवाड (वय ४४) रा. ज्योतीबानगर, भोकर याने मारहाण केली. 

हेही वाचाकोरोना उपचार : बारडच्या रुपेश देशमुख यांना कोवी शील्डचा पहिला डोस

न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले

शिविगाळ करुन थापडबुक्यानी मारहाण केल्यानंतर श्री. देबडवार यांच्या गळ्यातील सोन्याची दोन लाख रुपये किंमतीची चैन जबरीने चोरून घेतली. त्यानंतर हे दोघेजण आपल्या जीपमधून पसार झाले. यावेळी सतीश देबडवार यांनी अर्धापूर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्यांना सोबत घेऊन र्तारीच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या आदेशावरुन सतीश देबडवार यांच्या तक्रारीच्या आधारे केशव मुद्देवाड व त्याच्या एका साथिदारावर जबरी चोरीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामकिशोर नांदगावकर करत आहेत. पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले.

येथे क्लिक करा - पतीच्या अंत्यदर्शनाला मुकली पत्नी, कुठे व का ते वाचा...? -

सहा वर्षापासून शेतकऱ्याला वीज जोडणी मिळेना 

लोहा तालुक्यातील सोनखेड येथील शेतकरी पंडित तुळशीराम वड यांनी ता. दोन जून २०१४ मध्ये पाच हजार २०० रुपये अनामत रक्कम भरून शेतीच्या वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. परंतु महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सहा वर्षांचा कालावधी लोटला असला तरी त्यांना अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. सोनखेड येथील पंडित वड यांनी अनामत रक्कम भरली होती. तेव्हा त्यांना टेस्ट रिपोर्ट अहवाल नंबर ३२२ देण्यात आला. त्यावर विद्युत कंत्राटदाराची सही आहे. एखाद्या शेतकऱ्याने इलेक्ट्रिक मोटरचे बिल थकविले असेल तर त्याला वेगळा कर लावला जातो. मग पंडीत वडचे पाच हजार २०० रुपये सहा वर्षापासून महावितरण वापरत असेल तर त्यानाही व्याज मिळावे व ताबडतोब वीज जोडणी द्यावी अन्यथा रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल असे श्री. वड यांनी सांगितले. 

loading image