Nanded : नांदेडचे राजकीय वातावरण तापले...

निवडणुकीची तयारी सुरू; उद्‍घाटन, सभा, कार्यक्रमांतून शक्ती प्रदर्शन
खासदार हेमंत पाटील ,खासदार प्रताप पाटील चिखलीकर
खासदार हेमंत पाटील ,खासदार प्रताप पाटील चिखलीकरsakal

नांदेड : एकीकडे उन्हामुळे मे महिन्याच्या शेवटी वातावरण तापलेले असताना दुसरीकडे राजकीय गरमागरमीही वाढली आहे. कॉँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट तसेच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बीआरएसच्याही कार्यक्रमांनी जिल्ह्यात राजकीय वातावरणही तापले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने जवळपास सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता तयारीला लागले असल्याचे चित्र या निमित्ताने जिल्हाभरात दिसू लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर भाजप - शिवसेना शिंदे गटाचे सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर नुकत्याच कर्नाटकातील विधानसभा निवडणुका झाल्या. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची शक्यता घेता आता सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा कामाला लागल्याचे चित्र आहे. मे महिन्यात जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यातून शक्ती प्रदर्शनही करण्यात आले आहे.

माहूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार व नेतेमंडळी तसेच शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील आणि इतरांची उपस्थिती होती. त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीने सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळी शक्तीप्रदर्शन केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे नेतेमंडळीही यावेळी उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षातर्फेही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत उद्‍घाटन सोहळे केले. भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

खासदार हेमंत पाटील ,खासदार प्रताप पाटील चिखलीकर
Nanded Fraud : लाख रोख उकळले : गुन्हा दाखल होताच खंडणीबहाद्दर अटकेत

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाने देखील बैठका घेतल्या. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हदगाव आणि नांदेडला विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु

विविध विकासकामांचे उद्‍घाटन, जाहीर सभा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक, विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. सध्या तरी जिल्ह्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप - शिवसेना सामना सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यात बीआरएस, वंचित, एमआयएम सारखे पक्ष देखील तयारी करत आहेत. या निमित्ताने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर श्रेय घेण्यासाठी देखील चढाओढ सुरू झाली आहे.

खासदार हेमंत पाटील ,खासदार प्रताप पाटील चिखलीकर
Hingoli : हळद, कापूस, सोयाबीनने शेतकऱ्याला केली निराशा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com