नांदेड - पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूचा आकडा स्थिर; एक हजार स्वॅबपैकी २८ जण पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Monday, 30 November 2020

सोमवारी एक हजार ३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात २८ जणांचे अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड - मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत चढ उतार दिसून येत आहेत. सोमवारी (ता.३०) प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात २३ रुग्ण कोरोनामुक्त आणि एक हजार ३७ संशयितांच्या स्वॅब अहवालापैकी ९७३ निगेटिव्ह, २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

रविवारी (ता.२९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी एक हजार ३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात २८ जणांचे अहवाल नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ३८८ इतकी झाली आहे. गंभीर कोरोनाबाधित रुग्णांपैकी सोमवारी दिवसभरात एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूचा ५४९ वर स्थिर आहे. 

हेही वाचा - चोरट्यांची नवी शक्कल : नांदेडमध्ये सीसीटीव्ही फोडून महावितरणच्या कंत्राटदाराचे फोडले घर​

१९ हजार २५७ रुग्णांनी कोरोनावर मात 

सोमवारी दिवसभरामध्ये विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील - दोन, जिल्हा शासकीय रुग्णालयातील - नऊ, नांदेड वाघाळा महापालिकेअंतर्गत एनआरआय भवन- गृहविलगीकरण - पाच, भोकर - दोन, मुखेड - एक, देगलूर - एक आणि खासगी कोरोना कोविड सेंटरमधील - तीन असे २३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत १९ हजार २५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नांदेड वाघाळा महापालीका क्षेत्रात - २०, नांदेड ग्रामीण - दोन, लोहा - एक, माहूर - एक, किनवट - दोन, देगलूर - एक आणि मुखेड - एक असे २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचले पाहिजे- विधायक बातमी : लोकसहभागातून तयार होणारा पुल पूर्णत्वाकडे एकीचे बळ चे ज्वलंत उदाहरण ​

३८८ बाधितावर उपचार सुरू 

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा २० हजार ३८८ वर पोहचला आहे. त्यापैकी १९ हजार २५७ रुग्ण कोरोनामक्त आणि ५४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३८८ बाधितावर उपचार सुरू आहेत. त्यातील १४ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ४३७ स्वॅबची तपासणी सुरू होती. संध्याकाळपर्यंत विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १६९, जिल्हा शासकीय रुग्णालयात - ७५ खाटा रिक्त आहेत. 

कोरोना मीटर ः 

सोमवारी पॉझिटिव्ह - २८ 
सोमवारी कोरोनामुक्त - २३ 
सोमवारी मृत्यू - शुन्य 
एकूण पॉझिटिव्ह - २० हजार ३८८ 
एकूण कोरोनामुक्त - १९ हजार २५७ 
एकूण मृत्यू - ५४९ 
उपचार सुरु - ३८८ 
गंभीर रुग्ण - १४ 
स्वॅबची तपासणी सुरु - ४३७ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED - Positive patient mortality rate stable; 28 out of 1000 swabs are positive Nanded News