Prakash Ambedkar
esakal
नांदेड : महाराष्ट्रात सध्या चोरांचे सरकार सत्तेत आहे. तुम्हाला भल्याचे सरकार हवे असेल तर स्वतः सत्तेवर या. ‘धर्म संकटात नाही, पण तुमचे आरक्षण संकटात आले आहे. धर्माच्या नावाने जे राजकारण सुरू आहे, त्यामुळे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससारख्या देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे,’ अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.