
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जुन्या रितीरिवाजाप्रमाणे नवीन सालगडी शेती कामासाठी ठेवायची प्रथा आहे. मात्र आजघडीला सालगड्याचे भाव सव्वा लाखांच्या वर पोहोचले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
नांदेड : सालगड्याचा भाव गेला सव्वा लाखावर; शेतकऱ्यांना झाले अवघड
बरडशेवाळा ( जिल्हा नांदेड) : हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा, बामणी फाटा, पळसा, मनाठा परीसरातील निम्म्याहून अधिक कोरडवाहू जमीन आहे. तर मोजक्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. व या परीसरातील दोन नद्या व एक कालवा असल्याने थोड्या फार प्रमाणात विहीर व बोअरवेलमध्ये पाण्याची सोय असते. तर काही ठिकाणी कोरडवाहु जमीन आहे. मोठ्या शेतकऱ्यांकडे मनुष्य बळ कमी असल्याने जमीनीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना सालगड्याची गरज भासते व गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जुन्या रितीरिवाजाप्रमाणे नवीन सालगडी शेती कामासाठी ठेवायची प्रथा आहे. मात्र आजघडीला सालगड्याचे भाव सव्वा लाखांच्या वर पोहोचले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
बहुतांश मजुर बाहेर ठिकाणी गेले आहेत. परीसरात काही प्रमाणात बहुभुधारक जमीनीधारक शेतकरी आहेत. सालगड्याच्या नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला सुरु होत असल्याने बहुभुधारक शेतकरी आपल्या शेतात ऐनवेळी मजुर मिळत नसल्याच्या मागील वर्षीचे उदाहरणे लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या गावातील सालगड्यापैक्षा बाहेर तालुक्यातील पती- पत्नी यांना आपल्या शेतातील आखाडा किंवा गावात सोयीनुसार राहत असलेल्या गड्यांना पंसती देत असतात. पण सालगडी ही वर्षभर गुंतुन राहण्यापैक्षा महीनेवारी व रोजंदारीकडे वळले असल्याने परीसरात सालगड्याचा भाव सव्वा लाखांचा वर गेला असल्याने व योग्य दरात चांगला सालगडी बघण्यासाठी फिरत आहे. तर काही अल्पभुधारक शेतकरी चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा व बाजारातील उतरते भाव व सालगड्याची मनधरणी या अडचणीत पडण्यापैक्षा एक दोन वर्षांसाठी करार पद्धतीने शेती लावून मोकळे होत आहेत.
हेही वाचा - नांदेडमध्ये रेमडेसिव्हरचा काळा बाजार करणार्या चौघांना पोलिस कोठडी
मी अल्पभुधारक शेतकरी असून माझ्याकडे मनुष्यबळ कमी आहे. शेती टक्करने सोपी झाली आहे. पण ऐनवेळी मजुर भेटत नसल्याने सालगडी लावावेच लागतात. पण सालगड्याची मनधरणी करावी लागत असल्याने निसर्गाचा लहरीपणा योग्य वेळी उतरते भाव वाढती महागाई शेतीवर आधारित लावलेला खर्चही निघत नसल्याने अवघड परीस्थिती झाली आहे. पाडव्याला नवीन सालगडी लावण्यासाठी सालगडी मिळत नसल्याने नाईलाजाने विविध मार्ग शोधावे लागत आहेत.
- गुणाराव नाईक, शेतकरी, पळसा, ता. हदगाव.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Web Title: Nanded Price Servant Has Gone Rs One Lakh It Became Difficult Farmers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..