
नवीन नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी संयुक्तरीत्या विकसित केलेल्या गॅस सेन्सर संशोधनास जर्मनीकडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले. हे संशोधन एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, भविष्यात औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात त्याचा मोठा उपयोग होण्याची शक्यता आहे.