नांदेड : रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचे कोविडच्या विरोधात जन जागरण 

प्रल्हाद कांबळे
Friday, 9 October 2020

अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. नागभूषण राव यांनी उपस्थित रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना कोविड विरोधातील जन आंदोलनात सहभागी होण्याची शपथ दिली.

नांदेड : रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी गुरुवारी (ता. आठ) ऑक्टोबर रोजी कोविड-19  च्या विरोधातील जन आंदोलनात सहभागी होवून कोविडच्या काळात घ्यावयाची पूर्व खबरदारी विषयी जन जनजागृती करण्याची  शपथ घेतली.

अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक के. नागभूषण राव यांनी उपस्थित रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना कोविड विरोधातील जन आंदोलनात सहभागी होण्याची शपथ दिली. ही शपथ नांदेड रेल्वे विभागातील इतर सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकावर जसे नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, औरंगाबाद, आदिलाबाद, मुदखेड, नगरसोल, इत्यादी घेतली गेली.

हेही वाचा -  गुन्हे शाखा, विशेष पथक ढेपाळले, आयुक्तांनी नेमले ‘खास’ पथक -

कोविड-19 विरोधात ‘जन आंदोलन मोहीम’ सुरु

येणारा सणासुदीचा काळ आणि हिवाळा ऋतू  लक्षात घेवून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 विरोधात ‘जन आंदोलन मोहीम’ सुरु केली. या मोहिमेचा उदेश जन माणसात कोविड-19 च्या महामारीत सुरक्षित राहण्याकरिता घावायाची खबरदारी आणि या विषयी जन जागृती हा आहे. खबरदारी घेवून अनलॉकला सामोरे जाणे आणि न्यू नॉर्मल ही संकल्पना सफल करणे.

मोहिमेमध्ये मुख्यत्वे तीन बाबी 

ँ मास्क चा नियमित वापर,

ँ सुरक्षित शारीरिक अंतर,

ँ स्वच्छ हात.

हे जन आंदोलन प्रत्येक रेल्वे कर्मचारी, रेल्वे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच रेल्वे प्रवाशां  पर्यंत पोहोचले पाहिजे असे आवाहन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. हे जन आंदोलन अत्यंत प्रभावी, कमी खर्चिक आणि जास्त उपयोगी ठरण्याचा विश्वास श्री गोयल यांनी व्यक्त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Public awareness of railway department employees against covid nanded news