Nanded News: दिवाळी संपली; तरीही खासगी बसची भाडेवाढ कायम ;पुण्यासाठी दीड हजारांवर, तर मुंबईसाठी दोन हजारांच्या घरात भाडे

Private Bus Fares Remain High After Diwali, ST Buses Offer Relief : दिवाळीनंतर नांदेडहून पुणे-मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांना खासगी बसच्या वाढीव भाड्याचा फटका बसत आहे. रेल्वे आरक्षण फुल्ल असल्याने प्रवाशांचा कल माफक दरातील एसटीच्या लालपरीकडे वाढत आहे.
Passengers returning from Nanded after Diwali face high private bus fares and crowded railway reservations, turning to ST buses for affordable travel.

Passengers returning from Nanded after Diwali face high private bus fares and crowded railway reservations, turning to ST buses for affordable travel.

esakal

Updated on: 

नांदेड : दिवाळीचा सण संपल्यानंतर नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी बाहेरगावी परतणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, या परतीच्या प्रवासात सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. दिवाळीच्या काळात खासगी बसची केलेली भाडेवाढ अद्याप पूर्ववत झालेले नाही.

नांदेडहून पुण्याला जाण्यासाठी दीड हजार रुपयांहून अधिक, तर मुंबईसाठी दोन हजार रुपयांच्या घरात तिकीटदर आकारले जात आहेत.

Loading content, please wait...