नांदेड - शासकीय रुग्णालयापेक्षा पंजाब भवन- गृह विलगीकरणात सर्वाधित रुग्ण 

शिवचरण वावळे
Sunday, 8 November 2020

रविवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ४२, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये केवळ - ३७ आणि जुन्या इमारतीत केवळ ३५ असे तीन्ही ठिकाणी मिळून ११४ कोरोना बाधित रुग्णावर उचार सुरु आहेत.

नांदेड - जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या शासकीय रुग्णालयापेक्षा पंजाब भवन आणि गृह विलगीकरण कक्षात सर्वाधिक १४७ पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले आहे. रविवारी (ता. आठ) आलेल्या स्वॅब अहवालांपैकी ४८ जण कोरोनामुक्त, चौघांचा मृत्यू, तर ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने विष्णुपूरी शासकीय रुग्णालयात - ४००, जिल्हा रुग्णालयात- २०० तर शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात - शंभर खाटा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटल्याने शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात एकही कोरोनाचा रुग्ण ठेवला जात नाही. तर रविवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात ४२, जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये केवळ - ३७ आणि जुन्या इमारतीत केवळ ३५ असे तीन्ही ठिकाणी मिळून ११४ कोरोना बाधित रुग्णावर उचार सुरु आहेत.

या ठिकाणच्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे

त्यामुळे जिल्ह्यातील या तीन्ही महत्वाच्या रुग्णालयापैक्षा पंजाब भवनात जास्त रुग्ण ठेवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणच्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याने या ठिकाणच्या रुग्णांना सकाळ संध्याकाळ ऑक्सीमिटरने ऑक्सीजन लेव्हल, हार्टबीट चेक करणे, आयुष काढा, व्हिटॅमिन ‘सी’ ‘डी’च्या गोळ्या व्यतिरिक्त कुठलाही इलाज नाही. 

हेही वाचा- नांदेडचा जखमी लांडगा उपचारासाठी नागपुरात ​

रविवारी चार बाधित पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू 

रविवारी शासकीय रुग्णालयातील- सात, जिल्हा रुग्णालयातील - पाच, एनआरआयभवन, गृहविलगीकरण- १४, किनवट- दोन, बिलोली- तीन, अर्धापूर- सहा आणि खासगी रुग्णालयातील - दहा असे ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १८ हजार ३४५ रुग्‍ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दुसरीकडे राज कॉर्नर नांदेड पुरुष (वय- ७५), बोरगाव तालुका मुखेड पुरुष (वय-७०), डोरला तालुका लोहा पुरुष (वय- ५५), भोकर पुरुष (वय- ४५) या चार बाधित पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ५२९ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : सोनखेड खूनप्रकरणातील मारेकरी मोकाट -

२५ रुग्णांची प्रकृती गंभीर 

रविवारच्या प्राप्त अहवालात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २५, नांदेड ग्रामीण- एक, उमरी- एक, कंधार- एक, किनवट- एक, हदगाव- दोन, अर्धापूर - एक, लोहा- एक, भोकर - एक व मुखेड- एक असे ३५ कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ४४३ इतकी झाली आहे. त्यापैकी १८ हजार ३४५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ५२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संध्या ४०१ बाधितावर उपचार सुरु आहेत. यामधील २५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ४४३ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर -

आज पॉझिटिव्ह- ३५ 
आज कोरोनामुक्त- ४८ 
आज मृत्यू- चार 
एकुण पॉझिटिव्ह- १९ हजार ४४३ 
एकुण कोरोनामुक्त- १८ हजार ३४५ 
एकुण मृत्यू- ५२९ 
उपचार सुरु- ४०१ 
गंभीर रुग्ण- २५ 
स्वॅब तपासणी सुरु- ४४३ 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - Punjab Bhavan - Most patients in home separation than government hospital Nanded News