Video : नांदेडमध्ये कोविड पॉझिटिव्ह विद्यार्थी ‘जेईई’च्या परिक्षेपासून वंचित

शिवचरण वावळे
Friday, 4 September 2020

विद्यार्थ्यांच्या परिक्षा कधी घ्यायच्या यात राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा राजकीय वाद सुरु असताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणारच असे संकेत दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिक्षेची तयारी सुरु केली होती. परंतु अनेक परिक्षा केंद्रावर मात्र कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या परिक्षेबद्दल पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने हे विद्यार्थी परीक्षा द्यायला मुकले आहेत

नांदेड -  कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून राज्य सरकारने शाळा-महाविद्यालयांनी प्रवेश आणि इतर स्पर्धा परिक्षांच्या तारखेत बदल केले होते. जेईई परिक्षा देखील उशिराने घेण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी (ता. तीन) सप्टेंबरला विविध सेंटरवर ही परिक्षा घेण्यात आली. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने, त्यांना या परिक्षेला मुकावे लागले आहे.  

कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या विद्यार्थ्यांना जेईई सारख्या महत्वाच्या परिक्षेला बसता आले नसल्याने शुक्रवारी (ता. चार) विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जेईईची परिक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी संतप्त पालकांनी कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात शासनाने कुठलाही विचार केला नाही. 

हेही वाचा- स्वॅब देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल  प्रशासनाचे दुर्लक्ष; महिला, मुलांची कुचंबना ​

परिक्षा केंद्रावर आयसोलेशन वार्डाची उनिव

त्यांच्यासाठी परिक्षा केंद्रावर आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. परंतू प्रत्यक्षात कोरोना बाधित विद्यार्थ्यांसाठी परिक्षा केंद्रावर अशी कुठलिही व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी या विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये घेण्यात आले नसल्याने, त्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. 

हेही वाचा- नांदेड-  महावितरण कंपनीच्या बदनामी मागे कुणाचा हात, विज ग्राहकावर दुहेरी संकट, कसे? ते वाचाच​

सरकार लक्ष देणार का?

विद्यार्थ्यांनी देखील शासनाच्या या धोरणा विरोधात संताप व्यक्त करताना आमचे वर्ष वायाला जाणार असून, जेईई परिक्षा पुन्हा घेण्याचा शासनाने विचार करावा अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे सरकार किती गंभीरतेनी घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - Re-take JEE exam for Kovid positive students Nanded News