शिक्षणसेवक पदभरतीची गहाळ संचिका अखेर सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड जिल्हा परिषद

नांदेड : शिक्षणसेवक पदभरतीची गहाळ संचिका अखेर सापडली

नांदेड : डिसेंबर २००५ मध्ये झालेल्या शिक्षणसेवक पदभरतीची संचिका एका वर्षापासून जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्रशासनाला सापडत नव्हती. शिक्षणाधिकारी, विभागीय उप आयुक्त सुरेश बेदमुथा तसेच राज्याचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर (State Director of Education Dinkar Temkar) यांनी चौकशीचे आदेश देऊनही जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग गंभीर नव्हता. मात्र, नव्यानेच रुजु झालेल्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी ही संचिका शोधून काढली आहे.

‘आस’ शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने डिसेंबर २००५ मधील शिक्षणसेवक पदभरती संचिकेच्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२० मध्ये ग्राम विकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती. त्यानुसार श्री. मुश्रीफ यांनी ग्रामविकास विभागाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कारवाईचे निर्देश दिले होते.

हेही वाचा: नागपूर तीन झोन डेंजर; शुक्रवारी आढळले ६९८ कोरोना रुग्ण

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाला वारंवार सूचना देवून सदर संचिका शोधकार्यात योग्य भूमिका घेतली होती. तरीही, ही संचिका शिक्षण विभागाला सापडत नव्हती. अखेर काही दिवसांपूर्वीच प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेल्या सविता बिरगे यांनी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संचिकेच्या शोध कार्यात स्वतः लक्ष घातले. अखेर नवीन वर्ष सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ता. ३१ डिसेंबर रोजी ही संचिका जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्याखाली असलेल्या खोली क्रमांक सातमध्ये असलेल्या कपाटामध्ये सापडली.

संचिका तर सापडली, पुढे काय?

शिक्षणसेवक पदभरतीची ‘अ’ दर्जा असलेली ही संचिका कपाटात कोणी ठेवली होती, हे प्रशासनाला वर्षभरापासून माहित नव्हते का? वर्षभरापासून प्रशासनास भूलथाप देणारे अधिकारी, कर्मचारी कोण? संचिका नोंद रजिस्टरला संचिकेचा नंबर नोंदविल्यानंतर सदर संचिका कोणाच्या ताब्यात असायला हवी? या संचिकेबाबत हलगर्जीपणा कोणी केला? असे अनेक प्रश्न आता पडत असून, ते जिल्हा परिषदेमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top