नागपूर तीन झोन डेंजर; शुक्रवारी आढळले ६९८ कोरोना रुग्ण

साडेसात महिन्यानंतर सहाशेवर बाधित
Nagpur Three Zone Danger 698 corona patients were found on Friday
Nagpur Three Zone Danger 698 corona patients were found on Friday

नागपूर : गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ६९८ नवे कोरोनाबाधित (Corona interrupted) आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली. शहरातच सहाशेच्या घरात बाधित आढळून आले असून लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी या तीन झोनमध्ये बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महापालिका (Nagpur Municipal Corporation) प्रशासन सतर्क झाले असून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे पुन्हा मिनी लॉकडाउनची (Mini lockdown) शक्यता बळावली आहे. दरम्यान, आज ओमिक्रॉनचा (Omicron) एकही रुग्ण आढळून आला नाही.

Nagpur Three Zone Danger 698 corona patients were found on Friday
ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाबाधितांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत असल्याने प्रशासन, नागरिकांच्या चितेंत भर पडली आहे. गेल्या चोविस तासांमध्ये ६९८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ४ लाख ९६ हजार ६५ पर्यंत पोहोचली आहे. शहरात ५९३ बाधित आढळून आले आहे. ग्रामीणमध्येही बाधितांच्या संख्येचा आलेख सातत्याने वाढत आहे. चोविस तासांमध्ये ग्रामीणमध्ये ८९ रुग्ण वाढले आहेत. १६ बाधित जिल्ह्याबाहेरचे आहेत. ग्रामीणमध्ये वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनातही चिंता वाढली आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वेगात

महापालिकेने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही वाढविले आहे. दरम्यान, आज बाधितांच्या वाढत्या आलेखामुळे सक्रीय रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. सक्रीय रुग्ण २०५० असून यात शहरातील १ हजार ७७९ जणांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये २४६ सक्रीय रुग्ण आहेत. बाधितांची संख्या वाढत असतानाच आज कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येतही दिलासादायक वाढ आहे. गेल्या चोविस तासांत १३२ बाधितांंनी कोरोनावर मात केली. यात शहरातील ८० जणांचा समावेश असून जिल्ह्याबाहेरील ४९ तर ग्रामीणमधील तिघांचा समावेश आहे.

Nagpur Three Zone Danger 698 corona patients were found on Friday
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना कोरोनाची लागण

कार्यालय, बाजारांत स्पॉट चाचणी

वाढत्या कोरोनामुळे महापालिकेने विविध शासकीय कार्यालये, बाजारातील दुकाने, दुकानदार यांच्या चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारपासून विविध शासकीय कार्यालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी महापालिका आणखीही उपाययोजना करणार आहे.

महापालिका प्रशासन सतर्क

महापालिका प्रशासन आता सतर्क झाले असून नागरिकांच्या बिनधास्तपणावर नियंत्रण आणण्यासाठी काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यावर गंभीरतेने विचार करीत असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ व मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक बाधित आढळून येत असल्याचे मनपातील सुत्राने नमुद केले.

Nagpur Three Zone Danger 698 corona patients were found on Friday
राज्यातील रुग्णसंख्या वाढली! काल दिवसभरात 40 हजारच्या पार

साडेसात महिन्यानंतर सहाशेवर बाधित

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ६९८ बाधित आढळून आले. साडेसात महिन्यानंतर बाधितांची संख्या सातशेच्या घरात आहे. यापूर्वी २६ मे रोजी जिल्ह्यात ६८५ बाधित आढळून आले होते. शहरातही जवळपास आठ महिन्यानंतर पाचशेवर बाधित आढळून आले. १९ मे रोजी शहरात ५९१ बाधित आढळले होते.

"शहरात सातत्याने बाधितांची संख्या वाढत आहे. शहराच्या ज्या परिसरात संख्या वाढत आहे, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येईल. एवढेच नव्हे विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या करण्यात येत आहेत. सोमवारपासून बाजारातही चाचण्या करण्यात येईल."

- राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com