नांदेड : निवेदनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीची सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Registration facility in Collectorate for statement

नांदेड : निवेदनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीची सुविधा

नांदेड : औरंगाबाद विभागासाठी समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम २२ मे रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा ही वेळ निश्चित करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ज्‍या नागरीकांना, संस्‍थाना समर्पित आयोगाची भेट घ्‍यावयाची आहे अथवा निवेदन द्यावयाचे आहे. अशा नागरिकांनी, संस्‍थांनी त्‍यांचे, संस्‍थेचे नाव, पत्‍ता, दुरध्‍वनी क्रमांक व ई - मेल इत्‍यादी माहितीसह नोंदविणे आवश्‍यक आहे. ही नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारपर्यंत कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत इच्‍छुकांनी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे महाराष्‍ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्‍यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्‍यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्‍या भेटीच्‍या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्‍त कार्यालयात आपल्‍या नावाची नोंदणी भेटीच्‍या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे निवेदन करण्‍यात आले आहे.

जिल्‍ह्यातील नांदेड वाघाळा महापालिका तसेच नगरपालिकांमध्ये देगलूर, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड, हदगाव, लोहा, कंधार, किनवट, नगरपंचायत नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, माहुर या १७ नागरी क्षेत्रासाठी नगरपालिका प्रशासन विभाग, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे, तसेच ग्रामीण भागासाठी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कक्ष (हेल्‍प डेस्‍क) स्‍थापन करण्‍यात आला आहे. ता. २१ मे पर्यंत कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत इच्‍छुकांनी नोंदणी करणे आवश्‍यक राहील, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

Web Title: Nanded Registration Facility In Collectorate For Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedCollectorSakal
go to top