नांदेड - सोमवारी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

शिवचरण वावळे
Monday, 21 December 2020

सोमवारी (ता.२१) ४९३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ४५४ निगेटिव्ह, २९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ८९ इतकी झाली आहे.

नांदेड - काही दिवसांपासून दिवसाला एका कोरोना बाधिताचा मृत्यू होत असला, तरी सोमवारी (ता.२१) प्राप्त झालेल्या अहवालात २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सोमवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसून जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५६३ वर स्थिर आहे.

रविवारी (ता.२०) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी सोमवारी (ता.२१) ४९३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ४५४ निगेटिव्ह, २९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ८९ इतकी झाली आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

हेही वाचा - नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना अटक- सीआयडीची कारवाई, संतोष वेणीकर फरारच ​

२० हजार ३५ कोरोना बाधित रुग्ण बरे

त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५६३ वर स्थिर आहे. सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातील - चार, जिल्हा शासकीय रुग्णालय - दोन, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन - गृहविलगिकरण कक्षात - १५, देगलूर - तीन, कंधार- एक, हैदराबाद - एक आणि खासगी रुग्णालयातील - आठ असे ३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील २० हजार ३५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी पोहचले आहेत.

हेही वाचा - नांदेड : जवळगांव येथे 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मृतदेहाजवळ काळी पोत आढळून आल्याने घातपाताचा संशय ​

४३३ जणांचे स्वॅब अहवाल तपासणी सुरू

सोमवारी दिवसभरात नांदेड महापालिका क्षेत्राअंतर्गत २०, कंधार - एक, लोहा - एक, मुखेड - तीन, परभणी - एक आणि यवतमाळ - एक असे २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या २१ हजार ८९ इतकी झाली आहे. सध्या २९४ कोरोना बाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ४३३ जणांचे स्वॅब अहवाल तपासणी सुरू होती. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर ः

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह - २९
सोमवारी कोरोनामुक्त - ३५
सोमवारी मृत्यू - शुन्य
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २१ हजार ८९
एकूण कोरोनामुक्त - २० हजार ३५
एकूण मृत्यू - ५६३
गंभीर रुग्ण - १५
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत - ४३३
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Reports of 29 people tested positive on Monday Nanded News