esakal | नांदेड : निवासी डॉक्टरांची कोविड भत्त्यासाठी लढाई सुरुच । Doctor
sakal

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर

नांदेड : निवासी डॉक्टरांची कोविड भत्त्यासाठी लढाई सुरुच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: कोरोना काळात सर्वात पुढे निवासी डॉक्टर होते. त्यांनी जिवाजी परवा न करता रुग्णसेवा दिली. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून लढणाऱ्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड भत्ता दिला जावा अशी मागणी मार्ड संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. परंतु निवासी डॉक्टरांना आद्यापही कोविड भत्ता दिला गेला नाही. या विरोधात मार्ड संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. एक) पासून राज्यस्तरीय संप सुरु करण्यात आला आहे.

संपवार असलेल्या मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोविड भत्ता मिळालाच पाहिजे, परीक्षा फिस माप झालीच पाहिजे असा संदेश असलेले फलक हातात घेऊन विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय परीसरात घोषणा बाजी केली. इतकेच नव्हे तर मार्ड संघटनेच्या वतीने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची शैक्षणिक फीस माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, वसतीगृहातील समस्या, महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा टीडीएस संबंधी सकारात्मक निर्णय घ्यावा यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना वर्षभरापूर्वी निवेदन दिले होते. परंतु त्यावर आद्यापही काहीच ॲक्शन घेतली गेली नाही.

याची उपोषण कर्त्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा आठवण करुन देत निवासी डॉक्टरांच्या मागण्या राज्य सरकारकडून लेखी स्वरुपात पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. असा निश्चय केला आहे. संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याबद्दलचे माहिती पत्रक देखील पाठविण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे कळविले आहे.

मार्ड संघटनेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनावर मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. निलेश कल्याणकर, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. आबासाहेब तिडके, डॉ. अजित माने, डॉ. केदारनाद कुटे, डॉ. प्रसन्न नेने, डॉ. अर्पित धाकटे, डॉ. धनराज गिते, डॉ. शुभम कट्टी, डॉ. अक्षय चावरे, डॉ. साकेड मुंदडा यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

loading image
go to top