नांदेड : परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील कांदा पिकाला- बळीराजा अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या भागात परतीचा पाऊस मुबलक होण्याने, लवकर निचरा होणाऱ्या चांगल्या कसदार जमिनीतही बरेच दिवस पाणी साचून राहिल्याने, खरीप हंगामातील “पोळ कांद्याची” नैसर्गिक वाढ खुंटल्याने, याचा फटका कांदा उत्पादनावर होणार आहे. आधीच संकटात सापडलेला बळीराजा या नव्या अस्मानी संकटाने पुरता हतबल झाला आहे.

नांदेड : परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील कांदा पिकाला- बळीराजा अडचणीत

घोगरी (ता. हादगाव) : येथील शेतकरी अशोक संतराम काटकर यांची जमीन गावालगत व रस्त्याच्या कडेला असल्याने शेतीमाल वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ असल्याने दोन वर्षापासून ते खरीप व रब्बी हंगामातही कांदा  लागवड करून इतर पिकापेक्षा बऱ्यापैकी उत्पन्न मिळवित आहेत. गत वर्षी त्यांना एका एकर शेतीमध्ये पावसाळी कांदा पण 75 क्विंटल तर उन्हाळी 100 क्विंटल असे भरघोस उत्पन्न मिळाले होते.

परंतु” कोरोना” काळात साखळी विस्कळीत झाल्याने या शेती मलाच अतोनात नुकसान झालं. पिकवलेला हा नाशिवंत कांदा सर्वत्र टाळेबंदी होण्याने कवडीमोल किमतीत विकावा लागला. व काही शिल्लक राहिलेल्या कांद्याला आता ठोक दरात ( 30 ते 40 रुपये)  विकल्या जात असल्याने यातून बर्‍यापैकी मिळकत मिळाली.

यंदा सुरुवातीच्या काळात खरीप हंगामातील कांद्याला चांगली पोषक वातावरण मिळाल्यामुळे उत्पादन चांगले  मिळणार या आशेवर असलेल्या बळीराजाची पुन्हा परतीच्या पावसाने घोर निराशा झाली. मोसमातच या परिसरात मुबलक पाऊस होण्याने लवकर निचरा होणाऱ्या चांगल्या जमिनीतही बरेच दिवस पाणी साचून राहिल्याने, सोयाबीन, ज्वारी, कापूस, ही महत्वपूर्ण पिके वाया गेली. तर कुठेतरी तुरळक ठिकाणी असलेली कांद्याची लावगड ही या आस्मानी संकटात सापडल्या गेली. यामुळे कांदा वाडीची प्रक्रिया मंदावली. व करपा, कृषी या रोगाचा प्रादुर्भाव या कांदा पिकावर जाणवल्याने कांद्याची वाढ खुंटली गेली. कांदा पक्व झाला नसल्याने त्यांचे वजन घटल्या गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा -  हिवाळी अधिवेशनात झालेल्या बदलामुळे शिल्लक राहणाऱ्या निधीतून दिव्यांगांना अर्थसहाय्य करा - राहुल साळवे -

परतीच्या पावसाने एकदाची उसण दिली परंतु सोयाबीन पिक काढणीस, कापूस वेचणी, एकाच वेळी आल्याने, मजुराचे दर वधारले गेले. यामुळे काढणीस आलेल्या कांद्यास विलंब होऊ नये म्हणून, दूरवरून मजूर आणून कांदा काढणी सुरू केली. परंतु अपुऱ्या मजुरांमुळे कांदा काढणी वेग कमी झाल्याने, व जागोजागी कांदा जमिनीवर उघड्यावरच पडून असल्याने , या कांद्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाल्याने सदर शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.

सध्या कांद्याला भाव बऱ्यापैकी असल्याने बीटवर खूप विक्री 45 रुपये दराप्रमाणे सुरू भाव मिळतो आहे. कांदा काढणी लवकर झाल्यास सदर शेतकऱ्याला एका एकरमध्ये कमीत कमी 25 क्विंटल कांदा होण्याचा अनुमान आहे. सर्व खर्च वजा जाता कमीत कमी एक लक्ष मिळकतीचा शेतकऱ्यांनी अनुमान व्यक्त केला आहे. याशिवाय कांदा उत्पादन शेतीही अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी असून व व्यापारी दृष्ट्या कांदा पिक हे सर्वात महत्वाचे भाजी पीक असल्याने , सर्वांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रासपणे केला जातो. यामुळे हे पीक परवडणारे आहे इतर शेतकऱ्यांनी या अल्प खर्चिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे.अशोक संतराम काटकर कांदा उत्पादक शेतकरी आष्टी.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top