esakal | नांदेड : जबरी चोरी करणारी टोळी अटक, दिड लाखाचा ऐवज जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऐन दिवाळीत सापळा रचुन पाच अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, चांदीच्या अंगठ्या, खंजर आणि दुचाकी असा एक लाख ३४ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला. आरोपींनी शहरात विविध गुन्हे केल्याची कबुली दिली.

नांदेड : जबरी चोरी करणारी टोळी अटक, दिड लाखाचा ऐवज जप्त

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात व परिसरात अवैध शस्त्र बाळगणार्‍या आरोपीतांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबतच्या सूचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. या सुचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ऐन दिवाळीत सापळा रचुन पाच अट्टल गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, चांदीच्या अंगठ्या, खंजर आणि दुचाकी असा एक लाख ३४ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला. आरोपींनी शहरात विविध गुन्हे केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले सर्व पथक शहर व जिल्ह्यात कार्यरत केले. फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध आणि विविध गुन्ह्यातील मुद्देमाल वसुल करण्यासाठी कंबर कसली आहे. श्री. चिखलीकर यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन त्यांनी ता. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शहरातील नगिना घाट परिसरात आपले पथक पाठविले. पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी सापळा लावला. नगिना घाट परिसरातून अनिल उर्फ पंजाबी सुरेश पवार (वय २०) रा. गोविंदनगर नांदेड, सोनुसिंग राजेंद्रसिंग चव्हाण (वय २०) रा. भगतसिंग रोड नांदेड, अब्बास हाफीज जहमत अन्सारी (वय १९) रा. कसाईपूरा औरंगाबाद, संदीपसिंग गोविंदसिंग चव्हाण (वय २०) गुरुद्वारा गेट नंबर एक आणि लखन नागुराव कोलथे (वय २५) रा. धनेगाव (ता. जि. नांदेड) या पाच जणांना अटक केली. 

हेही वाचा नांदेड : गावठी कट्टा आणि एअरगण पिस्टलसह आरोपी जाळ्यात- स्थागुशाची कारवाई -

आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल

पोलिसांनी त्यांची कसुन चौकी केली असता त्यांनी इतवारा पोलिस टाण्याच्या हद्दीतून देगलूर नाका परिसरात एक लाखाची बॅग पळविल्याचे सांगितले. तसेच विमानत हद्दीतील रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोर बहिण भावाला लुटले, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाफना ओव्हरब्रीज ते महाराणा प्रताप चौक जाणाऱ्या रस्त्यावर लुटमार करुन मोबाईल आणि रोख रक्कम पळविल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून एक लाख ३४ हजार ७०० रुपयाचा ऐवज जप्त केला. एपीआय सुनील नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या सर्व आरोपींना इतवारा पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांनी घेतले परिश्रम

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक, हवालदार दशरथ जांभळीकर, संजय केंद्रे, गंगाधर कदम, सुरेश घुगे, अफजल पठाण, हनुमंत पोतदार, बालाजी तेलंग, बालाजी यादगिरवार, विलास कदम, रणधीर राजबन्सी, तानाजी यळगे, रवी बाबर, संजय जिंकलवाड, विठ्ठल शेळके, देवा चव्हाण आणि हेमंत बीचकेवार यांनी पार पडली. या पथकाचे पोलिस अधीक्षक श्री शेवाळे यांनी कौतुक केले.