नांदेड : ग्रामीण भागाचे विद्यार्थी, चळवळीतील केंद्रबिंदू- आमदार सतीश चव्हाण

file photo
file photo

मुदखेड (जिल्हा नांदेड) : शिक्षण पद्धतीचे मूळ ग्रामवासीयच होत. ग्रामीणसह शहरी भागाचे विद्यार्थी हे आपल्या बुद्धिमत्ते व कल्पना शक्तीला उजागर करून मराठवाड्यासह देशाचे नाव उंचावतात. त्यातच ग्रामीण भागाचे विद्यार्थी अनेक सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय होऊन न्याय व हक्कासाठी लढत असून ते चळवळीतील केंद्र बिंदू असल्याचे प्रतिपादन मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आ. सतीश चव्हाण यांनी मुदखेड दौऱ्यानिमित्त येथील महात्मा गांधी विद्यालयात शनिवारी (ता. 10) आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले.

वैद्यकीय अभ्यासक्रमामधील ७०/३० चा फॉर्म्युला शासनाने रद्द केला असल्याने मराठवाड्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचेही आ. सतीश चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष राम चौधरी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव पा.पवार निवघेकर, न. प. गटनेते तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष माधव पा. कदम, शिक्षक नेते यशवंत कांबळे, राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर, संजय उर्फ पप्पू सोनटक्के, प्रा. बी. डी. जांभरुणकर, शिवसेना शहरप्रमुख सचिन चंद्रे, सचिन पा. माने, राम सोनी, पत्रकार संजय कोलते, पत्रकार ईश्वर पिन्नलवार,  संजय राजे, कृष्णा चौधरी यांची उपस्थिती होती.

येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले

सदर भेटी दरम्यान आ.सतीश चव्हाण यांना २००५ नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २००५ पश्चात लागू केलेली अंशतः पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा तसेच सद्या शासन डी.सी.पी.एस.योजनेतून एन.पी.एस.योजनेत परावर्तित करत आहेत, परंतु त्या योजने बाबत खूप संभ्रम असून तो दूर करण्यात यावा आणि त्या विषयी सखोल माहीती शासनामार्फत सांगण्याच्या मागणीसाठी येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर जू.पे. संघटनेचे कदम, प्रा.प्रेम कुमार कौशल्ये, बोकारे, गिरी, मुखेडकर, नागरगोजे, गोडसे,  कौठकर, कोंपले, बुन्नावार, जोरगुलवार, गायकवाड, चौधरी, वाघमारे, वाढे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आ.चव्हाण यांना तत्परतेची साथ- भाजप नेते राम चौधरी!

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आ.सतीश चव्हाण यांना निवडणूक असो वा कोणत्याही क्षेत्रात आपण मदत करण्यासाठी आग्रही राहू, यापुढे व्यक्तीचे कर्तृत्व पाहूनच साथ देण्यात येईल असे सांगत भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी आ.सतीश चव्हाण यांच्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या मनोगतात केला तर माजी नगराध्यक्ष राम चौधरी हे ज्या- ज्या पक्षात कार्यरत होते त्या- त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला, पण सर्व पक्षात चौधरी यांनी आपल्या उत्तम कामगिरीचा ठसा उमटविला असे मत आ.सतीश चव्हाण यांनी यानिमित्ताने बोलतांना व्यक्त केले. उभयतांच्या या शाब्दिक जुगलबंदीमुळे शहर व तालुक्यात मात्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ::

नऊ हजार गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणूक रणधुमाळीला आता प्रारंभ झाला असल्याचे दिसून येत असून तालुक्यातील बारड आणि मुगट यासह जिल्ह्यातील अर्धापुर, भोकर व अन्य ठिकाणीही आ.सतीश चव्हाण यांनी भेट दिली असून त्यांच्या दौऱ्याचे प्रभावी नियोजनासाठी शिक्षक नेते यशवंत कांबळे, प्रा. बी. डी. जांभरुणकर, संजय राजे यांनी परिश्रम घेतले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com