esakal | नांदेड : बौद्ध स्मशानभूमीवरील आरक्षण उठविण्याची सांगवीकरांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सांगवीच्या बौद्ध समाजातील नागरिकांनी सदर बौद्ध स्मशानभूमीला मालमत्ता क्रमांक देऊन मान्यता देण्यात यावी आणि यावरील आरक्षण उठविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त झोन एक यांना देण्यात आले. 

नांदेड : बौद्ध स्मशानभूमीवरील आरक्षण उठविण्याची सांगवीकरांची मागणी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन सांगवी येथील गट क्रमांक २१४ मध्ये बौद्ध समाजाची पारंपारिक स्मशानभूमी आहे. याठिकाणी गेल्या ६० ते ७० वर्षांपासून अंत्यविधी संस्कार केले जातात. सांगवी परिसरात सात ते आठ हजार बौद्ध समाजाची लोकसंख्या असल्यामुळे या स्मशानभूमीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सांगवीच्या बौद्ध समाजातील नागरिकांनी सदर बौद्ध स्मशानभूमीला मालमत्ता क्रमांक देऊन मान्यता देण्यात यावी आणि यावरील आरक्षण उठविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त झोन एक यांना देण्यात आले. 

सांगवीसह वाढीव परिसरातील त्रिरत्ननगर, सिद्धार्थनगर, शिवनेरीनगर, अंबानगर, रामनगर, गौतमनगर, म्हाळजा आदी भागातील आठ ते दहा हजार बौद्ध समाजबांधव बौद्ध स्मशानभूमीचा वापर करत आले आहेत. या स्मशानभूमीसाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने ता. १७ नोव्हेंबर १९९२ रोजी ठराव घेतला. या ठरावात गट क्रमांक २१४ मधील ०.६४ म्हणजेच ६० गुंठे जागा स्मशानभूमीसाठी अधिग्रहित केली. याचाच आधार घेऊन २००५ मध्ये सांगवीचे तलाठी आणि मंडळ निरीक्षक यांच्या पंचनाम्याच्या आधारे तहसीलदारांनी २१४ मध्ये ६० आरची नोंद सातबारावर करून घेतली. हा सबळ पुरावा समजून बौद्ध स्मशान भूमीला मालमत्ता क्रमांक देऊन आरक्षण हटविण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन ता. १० ऑगस्ट रोजी सांगवीच्या बौद्ध नागरिकांनी झोन क्रमांक एकचे सहाय्यक आयुक्त यांना दिले.

हेही वाचा नांदेड : नवरात्रोत्सवात ना दांडीया, ना सार्वजनिक कार्यक्रम, भक्तात नाराजगी -

सांगवीच्या बौद्ध नागरिकांच्या स्मशानभूमीच्या प्रश्न

दरम्यान सांगवीच्या बौद्ध नागरिकांच्या स्मशानभूमीच्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रभाग ३ (ब) च्या नगरसेविका कौशल्या शंकर पुरी यांनी ता. नऊ ऑक्टोबर रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून गट क्रं. २१४ येथील बौद्ध स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे काय, या संदर्भातील माहिती मागविली असता झोन एकच्या सहाय्यक आयुक्तांनी सांगवी वाढीव क्षेत्रातील असून, सदर भागाचा प्रारूप प्रसिद्ध विकास योजनेनुसार सांगवी बु. गट क्र. २१४ आरक्षण क्रमांक ९१ फायर ब्रिगेडने काही भाग बाधित होत आहे. उर्वरित भाग रहिवास विभागात समाविष्ट आहे. गट क्रमांक २१४ नांदेड शहराच्या वाढीव क्षेत्रात असून विकास योजनेनुसार फायर ब्रिगेडसाठी आरक्षित असल्यामुळे सदर गटामधील ६० गुंठे मालमत्तेची नोंद करता येत नाही, असे म्हटले आहे. 

येथे क्लिक करा नांदेड : खाकीला लाचेचा डाग तर महसूल वाळूमुळे दुसऱ्या क्रमांकावर -

यांनी केली स्शळ पाहणी

हा प्रश्न निकाली लागावा तसेच या बौद्ध स्मशानभुमीचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी नगरसेवक प्रतिनिधी सदाशिव पुरी, रमेश गोडबोले आणि नांदेड भिमशक्ती शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी श्री. गर्जे, सांगवी-तरोड्याचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव, मनपाचे अभियंता श्री. दंडे, बिल कलेक्टर श्री. जोरावार यांनी बौद्ध स्मशानभूमीची स्थळ पाहणी केली. फायरब्रिगेडसाठी केवळ तीन गुंठे आरक्षित असल्यामुळे उर्वरित जागा बौद्ध स्मशानभुमीवरिल आरक्षण उठविण्यास काही हरकत नसल्याचे नगररचना विभागाचे अधिकारी श्री. गर्जे म्हणाले.