esakal | Corona Update : नांदेडला मंगळवारी एक कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

 corona infected

Corona Update : नांदेडला मंगळवारी एक कोरोनाबाधित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. १२) प्राप्त झालेल्या ६९२ अहवालापैकी एक अहवाल कोरोनाबाधित आला आहे. जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ९० हजार ३४५ एवढी झाली असून, यातील ८७ हजार ६७५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत १८ रुग्ण उपचार घेत असून यातील दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळविले आहे.

हेही वाचा: धोनीची वादग्रस्त निवड; BCCI सचिव जय शाह यांचा षटकार

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५२ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये महापालिका क्षेत्रात एक बाधित आढळला. महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील एका बाधिताला औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या १८ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरीत दोन आणि नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरणात १६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

हेही वाचा: यंदा दिवाळी पहाट साजरी करता येणार; नवी नियमावली जाहीर

नांदेड कोरोना मीटर

  • एकुण बाधित - ९० हजार ३४५

  • एकूण बरे - ८७ हजार ६७५

  • एकुण मृत्यू - दोन हजार ६५२

  • मंगळवारी बाधित - एक

  • मंगळवारी बरा - एक

  • मंगळवारी मृत्यू - शून्य

  • उपचार सुरु - १८

  • अतिगंभीर प्रकृती - दोन

loading image
go to top