
नांदेड : शिवसेना पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
कंधार : राजकिय सुड बुद्धीने शिवसेनेच्या नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुखावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्यावतीने तहसीदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने गुरूवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासुन महाराष्ट्रामध्ये बंडखोर आमदार हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असल्यामुळे शिवसैनीकामध्ये संतापाची लाट आहे.
या अनुषंगाने नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात हे कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यासाठी हिंगोली येथे गेले असता त्यांच्यावर राजकीय सुडबृध्दीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोटे गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे, आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही पुढे म्हटले आहे.
निवेदनावर उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, तालुका प्रमुख परमेश्वर पाटील जाधव, विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, शहरप्रमुख धनराज पाटील लुंगारे, उत्तम चव्हाण, भगवान जाधव, अतुल पापीनवार, माधव लुंगारे, जी. एम. पवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Web Title: Nanded Shiv Sena Office Bearers Against Cases Remove Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..