esakal | नांदेड : आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू- प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सदरील भेटीमध्ये जिल्ह्यातील कार्यरत सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कोरोना योद्धा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करणेसाठी विनंती  करण्यात आली.

नांदेड : आरोग्य कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू- प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - आरोग्य विभागातील कार्यरत आरोग्य कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नाबाबत म. रा. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ पुणे, जिल्हा शाखा नांदेडच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे यांची ता..23 ऑक्टोबर रोजी भेट घेवून चर्चा केली.

सदरील भेटीमध्ये जिल्ह्यातील कार्यरत सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कोरोना योद्धा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करणेसाठी विनंती करण्यात आली.

हेही वाचा -  नांदेड : दामिनी पथकाची धाडशी कारवाई, अट्टल गुन्हेगार जेरबंद -

या आहेत मागण्या

तसेच आरोग्य प्रशासनातील विविध संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठ प्रशासनाशी पाठपूरावा करणे, विविण संवर्गीय कर्मचार्‍यांची प्रलंबीत पदोन्नती प्रक्रिया राबविणे, आश्वासीत प्रगती योजनेच्या मागील वर्षाचे प्रलंबीत प्रस्ताव निकाली काढणे, श्रीमती कोलेवाड व मगरे प्रकरणी तत्कालीन आस्थापना कर्मचार्‍याच्या चौकशी अहवाल संघटनेला देणे, ता. 20 आॅक्टोबर रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त देणे, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चा दुरूपयोग टाळणे, प्रा. आ. कें. राजगड ता. किनवट येथील कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत प्रश्नासाठी स्वतंत्र चौकशी समिती गठीत करून सखोल चौकशी करणे याबाबत प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे यांनी सहमती दर्शवून सर्व प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही कास्ट्राईब संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.
वरिष्ठांकडून अचानक भेट देवून निलंबीत करण्यात आलेल्या चार आरोग्य कर्मचार्‍यांच्या पुर्नपदस्थापनेची संचिका संघटनेच्या विनंतीवरून तात्काळ वरिष्ठ प्रशासनास सादर केली आहे.

येथे क्लिक करा - पदवीधर मतदारसंघ निवडणुक हालचालींना वेग; भाजपा मतदार नोंदणी अभियान -

यांची उपस्थिती होती

यावेळी प्रशासनाकडून प्रशासन अधिकारी डॉ.अनिल रूईकर, संघटनेचे राज्य सहसचिव सुरेश आरगुलवार, केंद्रीय जिल्हाध्यक्ष दिनानाथ जोंधळे, केंद्रीय जिल्हा सल्लागार तथा मायनॉरीटी मिडीया मिशनचे (रजी) राज्य महासचिव अब्दुल सत्तार आरेफ, केंद्रीय जिल्हाध्यक्षा श्रीमती अंजना साखरे यांची उपस्थिती होती.