नांदेड : सोनखेडच्या सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक रद्द करा

जिल्हा परिषद सदस्यांची मागणी
Nanded Sonkhed Seva Sahakari Society election Cancel Demand
Nanded Sonkhed Seva Sahakari Society election Cancel Demandesakal

लोहा : लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक रद्द करा अशी मागणी सोनखेड सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे यांच्यासह नागरिकांतून राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुढे निवेदनात असे नमूद केले की, सोनखेड येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नियमाचे व कायद्याचे पालन न‌ करता निवडणूक कार्यक्रम लावल्यामुळे हा निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करुन नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून मग निवडणूक घ्यावी. सोनखेड सहकारी सोसायटीची निवडणूक काही मोजके व्यक्ती व राशन दुकानदार वगळता गावाला अंधारात ठेवून ग्राम पंचायतीच्या सरपंच व काही सदस्याला विश्वासात घेऊन मतदारांची प्रारुप यादी न लावता सुचना न देता वर्तमान पत्रामध्ये किंवा गावातील नागरिकांना न कळू देता अचानकपणे निवडणूक कार्यक्रम लावला आहे.

या अगोदरच्या निवडणुकीत मतदार संख्या ८५० होती पण ती कमी करून ३९२ केली आहे. त्यातही १२० मतदार हे मयत आहेत. १५ जणांचे मतदार यादीत दुबार नावे आहेत. तर १० जणांचा या गावाशी काहीही संबंध नाही ही मतदार वगळता मतदार यादी २०० मतदारांचीच होत आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी त्वरित‌ ही निवडणूक प्रक्रियेची डीडीआर मार्फत एआर व सेक्रेटरी यांच्या चौकशीचे आदेश देऊन या अगोदरची मतदार यादी ठेवून मयताचे नावे कमी करुन व नवीन मतदारांची नोंद करून यासाठी योग्य वेळ देऊन सहकार्य करावे व नियमांचे उल्लंघन करून निवडणूक लावणाऱ्यास योग्य ते शासन करावे अशी मागणी श्रीनिवास मोरे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com