नांदेड : क्रीडा संकुलाच्या मान्यतेसाठी कार्यवाही करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded sports complexes approval action order Ashok Chavan

नांदेड : क्रीडा संकुलाच्या मान्यतेसाठी कार्यवाही करा

नांदेड : शहरातील असर्जन - कौठा येथे प्रस्तावित जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिल्या. येथील विभागीय क्रीडा संकुलासह विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अमर राजूरकर, क्रीडा आयुक्त डॉ. ओमप्रकाश बकोरिया (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार आदी यावेळी उपस्थित होते.

नांदेड - लातूर मार्गावर असर्जन कौठा हद्दीत जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. २४ एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या क्रीडा संकुलांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना श्री. चव्हाण यांनी दिल्या. नांदेड येथे हे विभागीय क्रीडा संकुल विशेष बाब म्हणून उभारण्यात येत असून यामुळे जलतरण, बॉक्सिंग, धनुष्यविद्या आदी क्रीडा प्रकारांच्या सुविधा ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार आहेत. या संकुलासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच संकुलाच्या आराखड्यात किरकोळ सुधारणा करण्याचे निर्देशही पालकमंत्री चव्हाण यांनी दिले. यावेळी जिल्ह्यातील भोकर आणि मुखेड येथील क्रीडा संकुलाच्या आराखड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. लेखक, विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या संदर्भाने या बैठकीत पालकमंत्री चव्हाण यांनी आढावा घेतला.

Web Title: Nanded Sports Complexes Approval Action Order Ashok Chavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top