Nanded : प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रवासी-वाहतूकदारांची तक्रार सोडवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र
प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रवासी-वाहतूकदारांची तक्रार सोडवणार

प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रवासी-वाहतूकदारांची तक्रार सोडवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संघटनेने विविध मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यात संप काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी बस, स्कूल बस, मालवाहू वाहनामध्ये प्रवासी वाहतूक करण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. याबद्दल प्रवाशांना अथवा वाहतुकदारास काही तक्रार असल्यास प्रादेशिक परिवहन विभागास संपर्क साधावा त्यांची तक्रार सोडविली जाणार असल्याची माहिती विभागाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राउत यांनी केले आहे.

ता.आठ नोव्हेंबर २०११ च्या अधिसूचनेनुसार सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली गेली आहे. जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस, स्कुल बस संघटनाच्या प्रतिनीधीची बैठक मंगळवारी (ता.नऊ) नोव्हेंबर २०२१ रोजी परिवहन कार्यालयात आयोजीत करुन सर्व संघटनाच्या प्रतिनिधीना खासगी बस उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधुन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत या कार्यालयाने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. संपकालावधीमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रादेशिक परिहवन कार्यालयात २४ तास नियंत्रणकक्ष स्थापन करण्यात आला आहे. कार्यालयातील वायुवेग पथकाचे अधिकारी विविध तालुक्यातील डेपोला भेट देवून प्रवाशांना उदघोषकानी माहिती सांगून खासगी बसेस व इतर वाहनांच्या केलेल्या सुविधाबाबत माहिती देत आहेत.

इथे आहेत खासगी बस सुविधा : वायुवेग पथकामार्फत खासगी बस वाहनांची तपासणी करुन जादा भाडे आकारणी व इतर सुविधाबाबत प्रवाशांकडून माहीती घेत आहेत. या कार्यालयातील वायुवेग पथकाव्दारे हिंगोली गेट, बाफना पाँईट, एस. टी. स्टॅँड बाहेर तसेच जिल्ह्यातील विविध डेपो जवळ खासगी प्रवासी वाहने उपलब्द करुन देण्यात आली आहेत. अशा प्रकारची एकूण १५८ खासगी बस, स्कुलबस, इतर खासगी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. -----

loading image
go to top