नांदेड : एसटी कर्मचारी कामावर परतण्याच्या मार्गावर!

आठवडाभरात पूर्ण क्षमतेनी बससेवा सुरु होणार का?
nanded ST update st staff back to work
nanded ST update st staff back to worksakal

नांदेड : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व इतर मुख्य प्रलंबित मागण्यांसाठी एसटी महामंडळातील कामगार संपावर आहेत. सर्व एसटी कामगार संघटनांनी मिळून तयार केलेली कृती समिती सध्या नेतृत्वाअभावी भरकटलेल्या अवस्थेत असून दिशाहीन झाली आहे. त्यामुळे संपकरी कर्मचारी कामावर परत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

येत्या आठवडाभरात सर्व कर्मचारी कामावर परत येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, कर्मचारी कामावर परतल्यास पूर्ण क्षमतेनी एसटीची सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे देखील एसटीतील एका वरिष्ठ आधिकारी यांनी ‘सकाळ’ला माहिती दिली आहे. गुरुवारी (ता. १४) ४४ चालक व २५ वाहक यांच्यासह कार्यालयातील १७ असे ८६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे चालकांची संख्या १५५ तर वाहकांची संख्या १४५ तसेच कार्यशाळेतील कर्मचारी संख्या १२६ व प्रयोग शाळेतील कर्मचारी संख्या नऊ असे आठ दिवसात ४३५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे नांदेड विभागात नांदेड १८०, भोकर २७, किनवट ५०, मुखेड ११९, कंधार ९९, बिलोली १५२, देगलूर ९६, हदगाव ७३, आणि माहूर ३० व विभागीय कार्यालयातील सात असे ८३३ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

त्यामुळे विभागातुन १४७ एसटी बस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाल्या असून, पुढील आठवडाभरात विभागासह लांब पल्ल्याच्या मार्गावर देखील एसटी बससेवा पूर्ण क्षमतेनी सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.संपात सहभागी असलेल्या कामागारांना कामावर हजर होण्याच्या सुचना देऊनही अनेक कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने आत्तापर्यंत २६९ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. सध्या विभागातील एकुण दोन हजार ८६० कर्मचाऱ्यांपैकी ८३३ कर्मचारी कामावर हजर झाल्याने एक हजार ४४० कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संपात सहभाग आहे. त्यामुळे उर्वरित कर्मचारी देखील लवकरच कामावर हजर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com