नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांनी घातले सरकारचे श्राद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांनी घातले सरकारचे श्राद्ध

नांदेड : एसटी कर्मचाऱ्यांनी घातले सरकारचे श्राद्ध

नांदेड : अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी मागील पंधरादिवसापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. पंधरा दिवस उलटून देखील संपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे वैतागलेल्या कर्मचारी यांनी शुक्रवारी (ता.१९) महाविकास आघाडी सरकारचे श्राद्ध घातले.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जाव्यात. विशेषता एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनिकरण व्हावे व संप मिटावा असे एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रत्येक सदस्यांना वाटत आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होतील परंतु राज्य सरकारमध्ये विलनीकरण होणे सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकार देखील कर्मचाऱ्यांना कामावर परत या म्हणून आवाहन करत आहे. परंतु कर्मचारी विलनिकरणाच्या एकाच मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान होत आहे. दुसरीकडे प्रवाशांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. नांदेड विभागाचे देखील यात दहा कोटीपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर आले पाहिजे अशी आधिकारी यांची भावना आहे. मात्र त्याला न जुमानता एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. पंधरा दिवसापासून बसलेल्या एसटी कर्मचारी यांनी एकत्र येत सरकारचे श्राद्ध घातले.

loading image
go to top