esakal | नांदेड : शाळा सुरु करा, विद्यार्थ्यांनी पाठविले सीएमला पत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जागतिक टपाल दिनानिमित्ताने मारतळा जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून शाळा सुरू करण्याचे केले आवाहन

नांदेड : शाळा सुरु करा, विद्यार्थ्यांनी पाठविले सीएमला पत्र 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आधुनिक संगणकीय युगात पत्रांचे महत्त्व कमी झाल्याचे सर्वत्र पहायला मिळत आहे. याच निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा (ता. लोहा) येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना पोस्ट कार्ड आणून दिले व ‘एक पत्र मुख्यमंत्री’ यांना या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या पत्रात शाळा सुरु करण्याची केली मागणी.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शासनाच्या वतीने शाळा बंद, पण शिक्षण सुरू हे या अंतर्गत मोबाईल, दीक्षा अप, टिली-मिली व आमच्या शाळेच्या वतीने घरचा अभ्यास ह्या स्वाध्याय पुस्तिका आदींच्या माध्यमातून मुले शिक्षण घेत आहेत. परंतु मोबाईलमुळे व टीव्हीमुळे मुलांचे डोळे, डोके दुखत आहे, जास्त बैठे काम करून त्यांना आता कंटाळा आला, घरी सुध्दा करमत नाही, त्यामुळे शासनाने आता लवकरच शाळा सुरू करावी, आम्हाला शाळेत येऊ वाटत आहे, असे भावनिक आवाहन मुलांनी पोस्ट कार्डच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आनंद दरेगावे, डी. डी. होळकर, रमेश हणमंते हे उपस्थित होते.

हेही वाचा -  नांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नांदेड जिल्हा प्रभारीपदी ॲड. निशांत वाघमारे 

नांदेड : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशकडून काही निवडक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटनेला उभारी देण्यासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राज्याचे मंत्री जयंत पाटील व ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांनी या निवडक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्षवाढीच्या योजनेची आखणी केली आहे. त्यांचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. निशांत वाघमारे यांना नांदेड जिल्हा ग्रामीण व शहर यांची निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये पक्षावाढीचे आवाहन युवक पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.

यांनी दिल्या शुभेच्छा

नवनियुक्त निरीक्षकांना पुढील कामासाठी माजीमंत्री कमलकिशोर कदम, लातूर जिल्हाध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आ. शंकर धोंडगे, माजी आ. प्रदीप नाईक, प्रदेश सरचिटणीस हरिहरराव भोसीकर, रमेश शिळवणीकर, डॉ. सुनील कदम, युवक जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे, युवक प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, नांदेड शहराध्यक्ष रौफ जमिनदार, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.