नांदेड : SBI मधील दलालांचा सुळसुळाट थांबता-थांबेना

कंधारमध्ये ग्राहकांची पिळवणूक; शाखाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
Nanded state Bank of India Kandahar Branch
Nanded state Bank of India Kandahar Branch
Updated on

कंधार : ग्राहकांच्या अडचणीत वाढ करणाऱ्या कंधार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत दलालांचा सुळसुळाट झाला आहे. मोठ्या रकमासह कर्ज फाईल दलालांशिवाय पुढे सरकत नसल्याच्या तक्रारी आहेत. यातून ग्राहकांची प्रचंड प्रमाणात पिळवणूक होत असल्याचे समजते. शाखाधिकारी दलालांना पाठीशी घालत असल्याची चर्चा असून आधीच या बँकेत कोणतेही काम वेळेवर होत नाहीत, आता तर बँकेला दलालांचा विळखाच पडला म्हटल्यावर काही खरे नाही.

दलालांच्या प्रश्नासाह अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार प्रसार माध्यमातून वेळोवेळी चव्हाट्यावर आणला गेला, परंतू याकडे वरिष्ठांचे लक्ष नसल्याने बँकेतील दलालांचा सुळसुळाट थांबता थांबत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एसबीआय ही शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत शाखा आहे. हीच बाब येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुजोरपणा शिकवते की काय, असे वाटून जाते. या बँकेच्या नेहमीच तक्रारी आहेत. कामास दिरंगाई, कर्मचाऱ्यांचे ग्राहकास उद्धट बोलणे, ग्राहकांशी अरेरावी करणे, त्यांना ताटकळत ठेवणे, दलालांमार्फत गेल्यास तत्पर काम करणे हे नित्याचेच झाले आहे.

बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे येथील ‘दलालशाही’ फोफावत चालली आहे. या बाबत तक्रारी करूनही कोणी याकडे लक्ष देत नाही. परिणामी ग्राहकांना व शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. वेळेत काम करायचे असेल तर दलालांना पैसे द्या अन्यथा ताटकळत बसा, अशी अवस्था ग्राहकांची झाल्याचे बोलले जाते.

खासदारांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

कंधारमध्ये ११ जुलैला पार पडलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत उपस्थितांनी एसबीआय मधील दलालांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बँकेतील कारभाराविषयी शाखाधिकाऱ्यांना फैलावर घेऊन एसबीआय मधील कारभार सुरळीत करा, दलालांना आळा घाला, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या, ग्राहकांना तुसडेपणाची वागणूक देऊ नका, सर्वसामान्यवर अन्याय करू नका अशा सूचना दिल्या होत्या. परंतू खासदार म्हणो की आमदार म्हणो निगरगट्ट अधिकाऱ्यावर कशाचाही परिणाम होत नसल्याचे यानिमित्ताने पहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com