नांदेड : शिल्लक उसाचा प्रश्न कायमच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded sugarcane 42000 hectare area without pruning

नांदेड : शिल्लक उसाचा प्रश्न कायमच

नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील चार जिल्ह्यांत अद्याप ४२ हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक असल्याची माहिती सहसंचालकांनी दिली. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक ऊस शिल्लक असल्याची शक्यता आहे. सध्या विभागात २७ पैकी २६ कारखाने अजूनही सुरू आहेत.

विभागातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील नऊ सहकारी, १८ खासगी असे २७ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. विभागात गाळपासाठी एक लाख ५९ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होता. तर कारखान्यांनी एक कोटी ४५ हजार टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. २७ कारखान्यांची प्रतिदिन ७३ हजार ३०० टन ऊस गाळपाची क्षमता आहे. वाकोडी (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील शिऊस कारखाना २८ मे रोजी बंद झाला आहे. उर्वरित २६ कारखाने अद्याप सुरू आहेत. आतापर्यंत या कारखान्यांनी एक कोटी ३७ लाख ८ हजार ४५४ टन उसाचे गाळप केले आहे. एक कोटी ४३ लाख ५९ हजरी ३४२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

विभागात ऊसतोडणी मशीनची संख्या ८९ आहे; परंतु अनेक ठिकाणी मजुरांच्या माध्यमातून ऊस तोडणी सुरू आहे. उन्हाचा तडाख्यामुळे या कामावर परिणाम झाला आहे. नांदेडमध्ये चार हजार ४८ हेक्टर, परभणी ११ हजार ९६४ हेक्टर, हिंगोली दोन हजार ७५० हेक्टर व लातूर जिल्ह्यात २३ हजार २९५ हेक्टर असा एकूण ४२ हजार ५७ हेक्टर ऊस (१७ एप्रिलच्या अहवालानुसार) उभा असल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक ऊस शिल्लक असण्याची शक्यता आहे. नांदेड विभागात शिल्लक उसाची तोडणी होईल. तसे आदेश सर्वच कारखान्यांना देण्यात आले आहेत. काही कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील अतिरिक्त ऊस जवळच्या कारखान्यांना पाठविण्यात येत आहे.

- सचिन रावल, प्रादेशिक सहसंचालक (साखर)

Web Title: Nanded Sugarcane 42000 Hectare Area Without Pruning

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top