
तामसा व वडगाव येथे चोऱ्यांमुळे खळबळ
तामसा : तामसा शहरात चोऱ्याचे सत्र चालूच असून अज्ञात चोरट्यांनी येथील नरसिंह मंदिर परिसरातील घर फोडून चार लक्ष रुपयाचा रोख रकमेसह ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. रविवारी वडगाव बुद्रुक येथेही चोरांनी घरफोडी करत ३८ हजाराचा ऐवज लंपास करून पोलिसांना आव्हान दिले आहे. तामसा येथील व्यापारी ओम डोनगावे यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून कपाटातील रोख अडीच लक्ष रुपये व एक लक्ष ४२ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास लंपास केले.
चोरट्यांच्या आवाजामुळे झोपलेली घरातील लोक उठल्याचे लक्षात येताच दोघा चोरट्यांनी पोबारा केला. घरात दोन चोरटे होते. तर बाहेर काहीजण असण्याची शक्यता आहे. डोनगावे कुटुंबीय झोपलेले ठिकाण सोडून उर्वरित घरातील कपाटे, सुटकेस फोडून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला. तर चोरीच्या दुसऱ्या घटनेत वडगाव बुद्रुक येथील प्रकाश वाठोरे हे कुटुंबीयांसह घरावर झोपले असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडीत रोख आठ हजारसह वीस हजाराचे दागिने लंपास केले.
या दोन्ही घटना एकाच चोरट्यांकडून झाल्याची शक्यता आहे. सोमवारी पोलिस उपअधीक्षक अर्चना पाटील यांनी तामसा येथे चोरी झालेल्या घराची पाहणी करून सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे यांनी तपासकामी सूचना केल्या आहेत. दोन्ही ठिकाणी श्वानपथक पाचारण करण्यात आले. पण तपासात फारशी प्रगती नव्हती. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे करीत आहेत.
Web Title: Nanded Tamsa Wadgaon Theft Rs 45 Lakh Police In Search Of Thieves
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..