

Nanded
esakal
नांदेड: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच टनकपूर (उत्तराखंड)- नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेसच्या नियमित सेवेसाठी रेक उत्तर पूर्व रेल्वेकडे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड-टनकपूर एकमार्गी विशेष (टीओडी) एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रविवारी (ता. पाच) दिलेल्या माहितीनुसार हे रेल्वे (क्रमांक ०७६३१) मंगळवारी (ता. सात) रात्री अकराला नांदेड येथून सुटेल व गुरुवारी (ता. नऊ) सकाळी साडेसातला टनकपूरला पोचेल.