esakal | नांदेड तहसीलच्या पथकाने वाळू माफियांच्या आवळल्या मुसक्या
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - गोदावरी नदीकाठी तराफे जप्त करून जाळण्यात आले. 

नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून तराफ्याच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा होत असल्यामुळे महसूल विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. त्यासाठी नांदेड तहसील कार्यालयाने चार पथके कार्यान्वित केली असून त्याद्वारे कारवाई करण्यात येत आहे. 

नांदेड तहसीलच्या पथकाने वाळू माफियांच्या आवळल्या मुसक्या

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोना आणि टाळेबंदीचा फायदा घेत पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोके वर काढून अवैध वाळू उपसा सुरू केला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नांदेड तहसीलच्या वतीने गोदावरी नदीत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार पथके कार्यान्वित केली असून, त्याअंतर्गत वाजेगाव, मरघाट, नावघाट आणि ईदगाह भागात कारवाई करण्यात आली. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण व प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अजूनही अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. 

हेही वाचा - सर्वाधिक प्राधान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी - पालकमंत्री अशोक चव्हाण
 

तराफे पकडून जाळले
महसूलचे पथक सकाळीच कारवाईसाठी गोदावरी नदी घाटावर धडकले. नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्या पथकाने गोदावरी पात्रात वाजेगाव येथे १३, ईदगाह येथे १८ व मरघाट येथे २३ मोठे तराफे पकडले. याद्वारे अवैध वाळू उपसा होत होता. त्यामुळे सदर तराफे नष्ट करण्यासाठी पथकाने १२ हमाल आणले होते. सदर तराफे मोठ्या प्रमाणावर असल्याने श्री. काकडे स्वतः बोट घेऊन नदीत उतरले. या कारवाईत मंडळ अधिकारी कोंडीबा नागरवाड, गजानन नांदेडकर, चंद्रकांत कंगळे, खुशाल घुगे, बालाजी जेलेवाड व अनिरुद्ध जोंधळे, अनिल धुळगंडे, खुशाल घुगे, चंद्रकांत कंगळे तलाठी उमाकांत भांगे, आकाश कांबळे, रवी पल्लेवाड, ईश्वर मंडगीलवार, शिवलिंग गंटोड, संताजी देवापूरकर, सचिन नरवाडे, मंगेश वांगीकर, विजय रणवीरकर, राहुल चव्हाण, वाहन चालक जहिरोद्दीन हे मंडळ अधिकारी व तलाठी सहभागी झाले होते. या कारवाईत १६ ब्रास वाळू जप्त करून जायमोक्यावर लिलाव केला. 

तलाठी, मंडळ अधिकारीही कारवाईत सहभागी
यावेळी तलाठी कविता इंगळे, ज्योती निवडंगे, सोनाली काकडे, रेखा राठोड, अश्विनी सोलापुरे व रेखा मंडगीलवार यांनी स्वतः बोटीत बसून नावघाट येथे कारवाई केली; तसेच नागापूर येथे प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी खुशाल घुगे, अनिल धुळगंडे, तलाठी कैलास सूर्यवंशी, मनोज देवणे व राहुल चव्हाण यांनी अवैध उपसा करणारी बोट व वाहतूक करणारे टिप्पर पकडून तहसील कार्यालयात जमा केले. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडच्या भोलेश्वर पर्वतावर वड आणि पिंपळांची लागवड

वाळू माफियांवर लक्ष - तहसीलदार 
कोरोनाच्या संदर्भाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात तसेच इतर कामात महसूल प्रशासन व्यस्त असले तरी वाळूमाफियांवर लक्ष ठेवून आहोत. यापुढेही वाळू माफियांवर महसूल प्रशासन कारवाई करण्यात आहे. अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर यापुढेही अशीच दंडात्मक व फौजदारी कारवाई चालू राहील. 
- सारंग चव्हाण, प्रभारी तहसीलदार, नांदेड. 

loading image
go to top