esakal | गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक! नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड: गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड: गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : विनापरवाना गावठी कट्टा बाळगून रविनगर कौठा येथे रविवारी (ता.११) पहाटे पावणेचारच्या सुमारास संशयीतरित्या फिरणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त केले. (nanded the accused has been arrested with an unlicensed gun)

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात;व्हिडिओ

या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक जसवंतसिंघ शाहू, संजय केंद्रे, दशरथ जांबळीकर, तान्हाजी येळगे, रवी बावर हे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी रविवारी पेट्रोलिंग करत होते. सदर पथक ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत आले असता एक तरुण गावठी कट्टा बाळगून रविनगर कौठा येथे फिरत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी; दुबार पेरणीची शक्यता कमीच

या माहितीवरून पोलिसांनी पहाटे पावणेचार वाजताच्या सुमारास सदर आरोपीस ताब्यात घेतले. अजय महेशसिंह ठाकुर-तोमर (रा. रविनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझ़डती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस विनापरवाना बाळगत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी गावठी कट्ट्यासह आरोपीस ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. बिच्चेवार करत आहेत.

loading image