esakal | नांदेड जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी; समाधानकारक पाऊस झाल्याने दुबार पेरणीची शक्यता कमीच
sakal

बोलून बातमी शोधा

perani

नांदेड जिल्ह्यात ८८ टक्के पेरणी; दुबार पेरणीची शक्यता कमीच

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: यंदाच्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात आत्तापर्यंत ८८.०६ टक्के म्हणजेच सहा लाख ५४ हजार १३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. येत्या दोन चार दिवसात उर्वरित पेरण्या पूर्ण होतील. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने दुबार पेरणीची शक्यता मावळली आहे. यंदा जून महिन्यातच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली होती. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या खोळबंल्या होत्या. पाऊस नसल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली होती तर दुसरीकडे पाऊस नसल्याने पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय? अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र पुन्हा पाऊस सुरू झाल्याने समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीचेही संकट टळल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील आत्तापर्यंतची पेरणी

पिक - पेरणी क्षेत्र (हेक्टर) - टक्केवारी

भात - २१२ - २४.७१

ज्वारी - १८,८५५ - ३५.४१

बाजरी - १२ - ३६.३६

मका - ६९३ - १०६.७८

इतर तृणधान्य - ७५ - ३०

तूर - ५५,५६४ - ९१.४१

मुग - १८,७१२ - ६९.५८

उडीद - १९,२८७ - ६७.४२

तीळ - २५९ - ३२.४२

कारळ - ८८ - १८.६८

सोयाबीन - ३,६८,०३४ - ११८.९६

इतर गळीतधान्य - ७० - ७४.४७

कापूस - १, ७२,२७३ - ६६.१३

हेही वाचा: उस्मानाबाद-सोलापूर रेल्वेमार्गाचे काम कधी मार्गी लागणार?

तालुकानिहाय पेरणी केलेल्या क्षेत्राची टक्केवारी

नांदेड - ८२.२७, अर्धापूर - ९४.९४, मुदखेड - ६४.९३, लोहा - ९७.६२, कंधार - ९९.९४, देगलूर - १०१.२७, मुखेड - ७७.१०, नायगाव - ७०.२६, बिलोली - ७१.४४, धर्माबाद - ९२.८६, किनवट - ८८.२२, माहूर - ९५.७८, हदगाव - ९२.८९, हिमायतनगर - ९९.११, भोकर - ८६.९२, उमरी - ७८.२२, एकूण - ८८.०६

जिल्ह्यात सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. आजपर्यंत ८८ टक्के पेरणी झाली असून सध्या पिकांची परिस्थिती चांगली आहे. उर्वरित पेरण्या येत्या दोन ते तिन दिवसात पूर्ण होणार आहेत. त्याचबरोबर पाऊस झाल्यामुळे कुठेही दुबार पेरणीची आवश्यकता भासणार नाही.

- आर. बी. चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

loading image