Nanded Crime : नांदेडमधील मारतळाच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण काय आहे कारण?

Martala Theft Case : सोमवारी रात्री गोळेगावात दोन ठिकाणी चोरीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी मारताळ्यात चोरी केली.
nanded theft case stolen 90 thousand worth goods
nanded theft case stolen 90 thousand worth goods Sakal

मारतळा‌ : मारतळा‌ येथील वडार गल्लीत मंगळवारी (ता. ९) रात्री दोन घरांमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी ‌साखरझोपेत असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील‌ आठ ग्रॅमची सोन्याची पोत व‌ ३० हजारांचा अँड्रॉइड मोबाइल ‌असा अंदाजे‌ ९० हजारांचा ऐवज पळविला.

सोमवारी रात्री गोळेगावात दोन ठिकाणी चोरीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी मारताळ्यात चोरी केली. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, चोरीचे सत्र सुरूच असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

मारतळा‌ (ता‌. लोहा) येथील वडार गल्लीत मंगळवारी रात्री दुचाकी ‌रस्त्यावर उभी‌ करून चोरट्यांनी घरात प्रवेश करून अर्चना सिनू‌ पवार (वय‌ २४) ही महिला घरात‌ झोपली असताना दरवाजा ढकलून आत प्रवेश केला व तिच्या गळ्यातील चार ग्रॅमची सोन्याची पोत, ३० हजारांचा अँड्रॉइड मोबाइल हिसकावत चोरटे प्रसार होत असताना अर्चनाने चोरट्याची कॉलर पकडून आरडाओरडा केला.

nanded theft case stolen 90 thousand worth goods
Nanded Earthquake : भूगर्भातून आवाज... हादऱ्यामुळे आम्ही पडलो घराबाहेर, घाबरलेल्या महिलांनी सांगितली आपबिती

मात्र, चोरट्याने हिसका‌ देत पळ काढला. यावेळी शेजारील द्रोपदाबाई यल्लाप्पा साखळे यांच्या घरातही चोरट्याने प्रवेश करत तिच्या गळ्यातील साडेचार ग्रॅम सोन्याची पोत चोरली‌. बाहेर आरडाओरडा ऐकून दुचाकीवरून आलेले चोरटे‌ अंधाराचा‌ फायदा‌ घेत‌ कापसी रस्त्याने पसार झाले.

दोन गावांत चार घरफोड्या

उस्माननगर पोलिसांनी चोट्यांचा शोध लावण्यासाठी शोधमोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन‌ रात्रीत सलग दोन गावांत चार घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com