नांदेड : जिल्ह्यात आगीच्या तीन घटना, लाखोंचे नुकसान

प्रल्हाद कांबळे
Monday, 16 November 2020

पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर येत होता म्हणून अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाने आग पहिल्या मजल्यावर व बाजूच्या कार्यालयापर्यंत पोहचू दिली नाही. त्यात कापड दुकान जळून खाक झाले.

नांदेड : सध्या सवर्त्र दिवाळीच्या सणामुळे आनंदी वातावरण असतानाच रविवारी (ता. १५) पहाटे दोन वाजून २५ मिनिटाने लोहा तालुक्यातील मारतळा येथे उमेश दिगंबरराव कदम यांच्या बालाजी कपडा दुकानास आग लागली. हे दुकान इमारतीच्या तळ मजल्यावर आहे. कपडा दुकानाच्या बाजूला पंचायत समिती सभापती बालाजी पाटील यांचे कार्यालय आहे. तर पहिल्या मजल्यावर राहते घर आहे. पहाटेच्या सुमारास दुकानातून धूर येत होता म्हणून अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाने आग पहिल्या मजल्यावर व बाजूच्या कार्यालयापर्यंत पोहचू दिली नाही. त्यात कापड दुकान जळून खाक झाले.

आगीची दुसरी घटना

रविवारी (ता. १५) दुपारी एकच्या सुमारास शहराच्या अण्णाभाऊ साठे चौकसमोरील सैलानी हॉटेलच्या पाठीमागे एका स्कार्पियो कारला ( एसएच१३एसी७७) आग लागली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचले व कारला लागलेली आग आटोक्यात आणली.

हेही वाचा -  नांदेडकरांचा पाडवा गोड : माहूरचे रेणुकादेवी मंदीर भाविकांनी गजबजले, दर्शनाकरिता रांगा -

आगीची तिसरी घटना

दुपारी तीन वाजता हैदराबाद रोड काकांडीजवळ श्री बालाजी पेट्रोल पंपासमोर श्री शर्मा यांचा लोखंडी पाईपने भरलेला ( जीजे१३डीके ३७३५) हा ट्रक उभा होता. हा ट्रक तेलंगण्याहुन धुळेकडे जात होता. त्यास अचानक आग लागली. महापालिका अग्निशमन दल व एमआयडिसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले व आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठी हानी झाली असती. सुदैवाने वरील तीनही घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Three fire incidents in the district, loss of lakhs nanded news