नांदेड : नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी असून, नांदेड ते गोवा विमानसेवा येत्या ऑगस्टपासून सुरू करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. मात्र, सध्या या सेवेची प्रतीक्षा विमानतळ मंजुरी व स्लॉट अप्रूव्हल या दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर अडकलेली आहे..‘फ्लाय ९१’ या प्रादेशिक विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीने नांदेड ते गोवा या मार्गासाठी यंत्रणा उभी केली आहे. ऑगस्ट महिन्यात उड्डाण सुरू करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. सध्या कंपनीकडून विमानसेवेसंदर्भातील तयारी पूर्ण झाली असून, नांदेड विमानतळाकडून सुरक्षा व ऑपरेशनल मंजुरीची प्रतीक्षा आहे. शिवाय, स्लॉट मंजुरी मिळणेही प्रक्रियेत आहे. ही सेवा सुरू झाल्यास नांदेडमधून थेट गोव्याला हवाई प्रवास करण्याची सुविधा प्रथमच उपलब्ध होणार आहे..‘फ्लाय ९१’ कंपनीने नुकतीच सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू केलेली असून, त्याचे दर दोन हजार ते चार हजार रुपयांदरम्यान आहेत. सध्या नांदेडमधून हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, गाझियाबाद, बंगळूरू, आदमपूर (जालंधर) या ठिकाणी थेट हवाई सेवा उपलब्ध आहे..‘फ्लाय ९१’ ही कंपनी खास प्रादेशिक स्तरावरील लहान शहरांमध्ये हवाई संपर्क वाढवण्यासाठी कार्यरत असून, नांदेडसारख्या उभरत्या शहरांना जोडणे हे त्यांचे धोरण आहे. यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि शिक्षणासाठी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी उर्वरित मंजुरी प्रक्रिया लवकर पूर्ण होईल आणि ऑगस्ट महिन्यात नांदेड ते गोवा हवाई मार्ग प्रत्यक्षात कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..US Measles Outbreak : अमेरिकेतील मुलांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव; उच्चाटनानंतर प्रथमच प्रसार,रुग्णसंख्या एक हजारवर.नांदेड ते गोवा विमानसेवा येत्या ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. स्लॉट मंजुरी व नांदेड विमानतळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. लवकरच पूर्ण करून नांदेड ते गोवा विमानसेवेची सुरवात ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के करण्यात येईल.-अनुप नायर,‘फ्लाय ९१’ कंपनीचे प्रतिनिधी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.