नांदेड : पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

प्रल्हाद कांबळे
Friday, 13 November 2020

या प्रशिक्षणासाठी उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती दिपाली मोतीयाळे, उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्‍हाधिकारी (भुसंपादन) डॉ. सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व  तहसिलदार किरण आंबेकर आदी अधिकारी उपस्थित होते.  

नांदेड :  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 च्या निवडणूक विषयक कामकाजाच्‍या अनुषंगाने सर्व मतदान केंद्राध्‍यक्ष, मतदान अधिकारी व झोनल अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृह नांदेड येथे आज घेण्‍यात आले. जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी हे प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षणासाठी उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) श्रीमती दिपाली मोतीयाळे, उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्‍हाधिकारी (भुसंपादन) डॉ. सचिन खल्‍लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व  तहसिलदार किरण आंबेकर आदी अधिकारी उपस्थित होते.  

मतदान केंद्रावरील कामाचे प्रशिक्षणासोबत जिल्‍हा ग्रंथालय येथील 6 विविध कक्षामध्‍ये लोखंडी मतपेटी उघडणे, मतदानासाठी तयार करणे व मतदानानंतर सील करणे इत्‍यादी बाबतचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्‍यात आले. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाच्‍या दिवशी पार पाडावयाच्‍या विविध कामांची प्रात्‍याक्षिक घेण्‍यासाठी डमी मतदान केंद्र तयार करुन प्रशिक्षण देण्‍यात आले.

हेही वाचा -  नांदेड- फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा आरोग्य विभागाचे आवाहन, नांदेडला २७ पॉझिटिव्ह, ४२ जण कोरोनामुक्त

या प्रशिक्षणासाठी मतदान केंद्राध्‍यक्ष 144, मतदान अधिकारी 437 आणि झोनल अधिकारी यांना दोन सत्रात हे प्रशिक्षण देण्‍यात आले. त्‍यासाठी प्रेक्षागृहात सुरक्षित अंतर राखुन 50 टक्के बैठक क्षमतेचा वापर करण्‍यात आला. अनुपस्थित असलेल्‍या 9 मतदान केंद्राध्‍यक्ष व 25 मतदान अधिकारी यांना लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियमाखाली कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्‍या. अनुपस्थित असलेल्‍या संबंधिताचे खुलासे असमाधानकारक असल्‍यास नियमानुसार कार्यवाही प्रस्‍तावित करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.     

या प्रशिक्षणापूर्वी प्रशिक्षण केंद्राला पूर्णतः र्निजंतुकीकरण करण्‍यात आले. या प्रशिक्षणादरम्‍यान कोविड 19 च्‍या अनुषंगाने अँटीजेन टेस्ट, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व मास्कचे वाटप इत्‍यादी सुविधा प्रशिक्षणादरम्‍यान उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्‍या होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Training of officers and staff involved in the graduate constituency election process nanded news