esakal | नांदेडला पुन्हा हादरा : सोमवारी दिवसभरात ३४ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ६५० वर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

१२३ अहवालापैकी ८० निगेटिव्ह तर ३४ व्यक्ती बाधित आढळले. बाधितांची संख्या एकुण ६५० एवढी झाली आहे. दाखल रुग्णांपैकी २७ रुग्णांची प्रकृती गंभीर

नांदेडला पुन्हा हादरा : सोमवारी दिवसभरात ३४ पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली ६५० वर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सोमवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या १२३ अहवालापैकी ८० निगेटिव्ह तर ३४ व्यक्ती बाधित आढळले. बाधितांची संख्या एकुण ६५० एवढी झाली आहे. दाखल रुग्णांपैकी २७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी कळविले आहे. 

कोरोनाचे जिल्ह्यातील १० बाधित व्यक्ती सोमवारी (ता. १३) पूर्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 3८५ बाधितांना सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारी (ता. १३) विकासनगर कंधार येथील ७५ वर्षीय रुग्ण तर दुलेशहानगर, नांदेडमधील ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रविवारी (ता. १२) रोजी धनेगाव (ता. नांदेड), जळकोट (लातूर) आणि तबेला गल्लीमुखेड येथील ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारा दरम्यान शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे मृत्यू झाला. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, मधुमेह इतर गंभीर आजार होते. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ३० एवढी झाली आहे.

‘या’ परिसरातील पॉझिटिव्ह रुग्ण

नवीन बाधितांमध्ये एसपी आॅफीस एक, सोमेश कॉलनी एक, चौफाळा दोन, वजिराबाद सात, इतवारा एक, कौठा दोन, आनंदनगर एक, वाजेगाव एक, अंकानगर, देगलूर एक, लाईनगल्ली दोगलुर एक, 
गांधी चौक दोन, कासराळी बिलोली एक, तबेला गल्ली एक, मंडलापूर, मुखेड एक, मुखेड दोन, विकासनगर, कंधार एक, कंधार एक, धर्माबाद एक, लोहा एक, नायगाव एक आणि गंगाखेड (परभणी) एक.

हेही वाचा - धक्कादायक : पोलिस हवालदाराला मारहाण, फाडले कपडे ​

२३० पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु

आज रोजी २३० पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील २७ बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १२ महिला बाधित व १५ पुरुष बाधित आहेत. आज रोजी ३३३ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल मंगळवारी (ता. १४) संध्याकाळी प्राप्त होतील.

६५० बाधितांपैकी ३५ बाधितांचा मृत्यू 

आज रोजी ६५० बाधितांपैकी ३५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ३८५ बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत २३० बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ७४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ६२, मुखेड कोविड केअर सेंटर येथे २९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे सात, जिल्हा रुग्णालय येथे नऊ, बिलोली कोविड केअर सेंटर येथे नऊ, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे पाच, किनवट कोविड केअर सेंटर येथे दोन, हदगाव कोविड केअर सेंटर येथे एक बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात १९ बाधित व्यक्ती उपचार घेत असून आठ बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत.  

कोरोना मिटर

सर्वेक्षण- एक लाख ४७ हजार७९४,
घेतलेले स्वॅब- आठ हजार ४१९,
निगेटिव्ह स्वॅब- सहा हजार ४५४,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ३४, 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ६५०,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- सहा,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- ०,
मृत्यू संख्या- ३५,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ३८५,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- २३०,
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या ३३३ एवढी संख्या आहे.

येथे क्लिक कराVideo - ऊर्जामंत्री नितीन राऊत मंत्री आहेत की सावकार? प्रा. सुनील नेरलकर

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.