

Nanded News
esakal
नांदेड: देशातील हळदीच्या घसरत्या दरांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून, यामागे एनसीडीईएक्स-प्रमाणित गोदामांमधील कथित अनियमितता कारणीभूत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी), नॅशनल कमोडिटी ॲण्ड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड तसेच टर्मरिक बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.