नांदेड : जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; एकाने गळफास तर दुसऱ्याचा शाॅक लागल्याने 

file photo
file photo

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यात एकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन तर दुसऱ्या घटनेत विद्यूत शाॅक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नायगाव आणि इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नायगाव तालुक्यातील मोकासदरा येथे रविवारी (ता. 14 ) मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती अशी की मोकासदरा (तालुका नायगाव ) येथील व्यंकट बालाजी वंचेवाड (वय 21) शेतकरी आपल्या शेतावर काबाडकष्ट करुन परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. परंतु मागील काही वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेने त्याच्या शेतावर सतत नापिकी होत होती. आसमानी व सुलतानी संकटाला कंटाळून त्याने घर प्रपंच चालवण्यासाठी बँकेचे कर्ज काढले. परंतु शेतातील उत्पादन घटल्याने कर्जाची परतफेड ते वेळेत करु शकले नाही. कर्जाचा डोंगर वाढत गेला या विवंचनेतून व्यंकट वंचेवाड यांनी आपल्या स्वतः च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती भारत विठ्ठल बासरी यांनी नायगाव पोलिसांना दिली.नायगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

विद्यूत शाॅक लागल्याने मृत्यू

तर दुसर्‍या घटनेत शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यास विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू किनवट तालुक्यातील तल्हारी शिवारात नारायण भगवान वानोळे (वय २८) हा शेतकरी आपल्या ज्वारीच्या पिकास पाणी देत असताना खांद्यावर लोखंडी फावडा होता. यावेळी डोक्याजवळून गेलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेला स्पर्श झाला आणि जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दत्ता वानोळे यांच्या माहितीवरुन इस्लापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार शेख करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com